France vs Morocco: मोरोक्कोचे सप्न भंगले! फ्रान्स सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये

फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत फ्रान्सने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
France
France Dainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: बुधवारी रात्री उशिरा फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत दुसरा उपांत्य सामना मोरोक्को विरुद्ध फ्रान्स संघात झाला. अल बायत स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने मोरोक्कोला 2-0 अशा गोल फरकाने पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र, मोरोक्कोचे विश्वविजयाचे स्वप्न या पराभवामुळे भंगले.

या सामन्यात मोरोक्कोने चांगली सुरूवात केली होती. विशेष म्हणजे त्यांचा फ्रान्सपेक्षा अधिक वेळ चेंडूवर ताबा होता. मात्र, त्यांना फ्रान्सचा बचाव भेदत गोल करणे शक्य झाले नाही. फ्रान्सकडून सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला थियो हर्नांडेझने पहिला गोल केला. या गोलसह फ्रान्सचे खातेही उघडले.

France
FIFA World Cup 2022: मेस्सीला भिडणारा रेफ्री वर्ल्डकपमधून बाहेर, क्वार्टर-फायनलमध्ये झालेला राडा

पण त्यानंतरही मोरोक्कोने फ्रान्स पहिल्या हाफमध्ये अधिक आघाजी घेणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघ एकमेकांना आव्हान देत होते, पण गोल करण्यात त्यांना अपयश येत होते. पण अखेर रांडल कोलो म्युआनीने 79 व्या मिनिटाला गोल केला आणि फ्रान्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर मोरोक्कोला पुनरागमन करता आले नाही आणि हा सामना फ्रान्सने आपल्या नावावर केला. दरम्यान, मोरोक्कोचा वर्ल्डकपमधील पहिलाच उपांत्य सामना होता. तसेच मोरोक्को वर्ल्डकपमधील उपांत्य सामना खेळणारा पहिलाच आफ्रिकन संघही आहे. त्याचबरोबर फ्रान्सने यापूर्वी 2018 ला झालेल्या फिफा वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते.

फ्रान्सला मोठा विक्रम करण्याची संधी

फ्रान्सने आता अंतिम सामन्यात प्रवेश केला असल्याने आता त्यांना सलग दोनवेळा वर्ल्डकप विजितेपद मिळवण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. यापूर्वी केवळ इटली आणि ब्राझील संघानेच असा कारनामा केला आहे. इटलीने 1934 आणि 1938 आणि ब्राझीलने 1958 आणि 1962 असे सलग दोन वर्ल्डकप जिंकले आहेत.

अर्जेंटिनाशी गाठ

फ्रान्सचा आता अंतिम सामन्यात अर्जेंटिनाशी सामना होणार आहे. अर्जेंटिनाने क्रोएशियाला पहिल्या उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात रविवारी अंतिम सामना रंगेल.

तसेच त्यापूर्वी शनिवारी उपांत्य फेरीतील पराभूत संघ क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com