धडाकेबाज फलंदाज पोलार्डच्या वाढदिनी MIचा विजय नक्की, वाचा कारण

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज कायरॉन पोलार्ड 35 वर्षांचा झाला.
Kieron Pollard
Kieron Pollard ANI
Published on
Updated on

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard Birthday) आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. पोलार्डनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. मात्र यावर्षी पोलार्डसाठी हा आयपीएल सिझन निराशाजनक ठरला.

पोलार्ड मुंबईच्या अपयशी खेळाडूंपैकी एक आहे. बॅटींग आणि बॉलिंगच्या पातळीवर त्याने चांगल्या स्कोरसाठी संघर्ष केला आहे. आज पोलार्डच्या खराब फॉर्मनंतरही चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये मुंबईचा विजय होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारणही तसेच खास आहे.

पोलार्डनं या आयपीएल सिझनमध्ये 11 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं फक्त 144 रन दिले आहेत. या सिझनमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकवता आलेलं नाही. 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. पोलार्डच्या खराब फॉर्मचा परिणाम यंदा मुंबई इंडियन्सवरही झाला आहे.

मुंबईची टीम आयपीएलमधून आऊट झाली आहे. या सर्व प्रकारच्या खेळी नंतरही 12 मे हा दिवस पोलार्ड आणि मुंबई संघासाठी खास आहे. पोलार्डच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्स आजवर एकदाही पराभूत झालेली नाही.

Kieron Pollard
IPL 2022|इशान किशनने केली चूक मान्य

कायरन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. पोलार्डची टीममध्ये एंट्री झाल्यानंतर मुंबईनं आजवर 12 मे रोजी तीन सामने खेळले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे त्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. आज चौथ्यांदा मुंबईची टीम याच दिवशी मैदानात उतरणार आहे. तेव्हा चाहत्यांचे आज पोलार्डकडे पुर्ण लक्ष असेल.

12 मे 2012 रोजी मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 27 रनांनी पराभव केला होता. मात्र त्या मॅचमध्ये पोलार्डला बॅटींग करण्याची संधी मिळाली नाव्हती. 12 मे 2014 रोजी मुंबईने दुसऱ्यांदा पोलार्डच्या वाढदिवशी आयपीएलचा सामना खेळला होता. या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सनी पराभव केला होता. त्या मॅचमध्ये पोलार्डने 7 बॉलमध्ये 6 रन केले होते.

Kieron Pollard
IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 मध्ये फक्त एक भारतीय

12 मे 2019 रोजी पोलार्डचा वाढदिवस हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात खास ठरला होता. त्या दिवशी झालेल्या आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने शेवटच्या बॉलवर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. लसिथ मलिंगानं शार्दुल ठाकूरला आऊट करत मुंबईच्या चौथ्या आयपीएल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com