महेला जयवर्धनेच्या ड्रीम टीममध्ये एक भारतीय तर दोन पाकिस्तानी

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी आपल्या स्वप्नातील टी-20 संघातील पहिल्या पाच खेळाडूंची घोषणा केली आहे.
Mahela Jayawardene
Mahela JayawardeneDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या स्वप्नातील टी-20 संघातील पहिल्या पाच खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यांनी या संघात एक भारतीय आणि दोन पाकिस्तानी खेळाडू ठेवले आहेत. त्याचबरोबर पाच खेळाडूंमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंडचा (England) प्रत्येकी एक खेळाडू आहे. (Former Sri Lanka captain Mahela Jayawardene's dream team has one Indian and two Pakistani players)

दरम्यान, जयवर्धनेने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jaspreet Bumrah) एकमेव भारतीय म्हणून निवडले आहे. मात्र, बुमराह हा जयवर्धनेचा तिसरा पर्याय असेल. जयवर्धनेची पहिली निवड अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) आहे. रशीद सध्या गुजरात टायटन्सकडून आयपीएल खेळत आहे. जयवर्धने म्हणाले की, 'राशिद कोणत्याही परिस्थितीत विकेट घेण्यात पटाईत आहे. त्याचबरोबर फलंदाजीसाठी शेवटच्या क्रमांकावर येऊनही धावसंख्या उभारण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे.'

Mahela Jayawardene
IPL 2022: '...चांगली कामगिरी करतोय', तिलक वर्माने यशाच्या रहस्याचा केला खुलासा

तसेच, या पाच खेळाडूंमध्ये जयवर्धनेने पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचाही समावेश केला आहे. गेल्या एका वर्षात शाहीन हा टी-20 मधील सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. जयवर्धने म्हणाले की, 'गेल्या वर्षी शाहीनने विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली होती. तो पहिल्या काही षटकांत विकेट घेण्यात पटाईत असून डेथ ओव्हर्समध्येही चांगली गोलंदाजी करतो.'

त्याचवेळी जयवर्धनेने पाकिस्तानच्या (Pakistan) मोहम्मद रिझवानला आपल्या ड्रीम टीमचा यष्टिरक्षक बनवले. जयवर्धने म्हणाले की, 'मला माहित आहे की, रिझवान ओपन करतो, पण तो मधल्या फळीतही फलंदाजी करु शकतो. तो फिरकी गोलंदाजाविरोधात उत्तम खेळाडू आहे.' सरतेशेवटी, जयवर्धने यांनी गंमतीने सांगितले की, ''जर आयसीसीने मला ड्रीम टीममध्ये जुन्या खेळाडूचे नाव देण्यास सांगितले तर मी बटलरचा सलामीचा जोडीदार म्हणून ख्रिस गेलची निवड करेन.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com