भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग कोरोना पॉझिटिव्ह

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची (Harbhajan Singh) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताच्या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे.
Harbhajan Singh Corona Positive
Harbhajan Singh Corona Positive Dainik Gomantak
Published on
Updated on

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर भारताच्या माजी फिरकीपटूने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. हरभजन सिंगने त्याला कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. यासोबतच संपर्कात येणाऱ्या लोकांनी तात्काळ कोरोना चाचणी करावी असंही त्याने सांगितलं आहे. भज्जीने (Harbhajan Singh) ट्विटमध्ये म्हटलं की, ''मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे मी घरीच क्वारंटाईन राहून आवश्यक ती खबरदारी घेत आहे.'' (Former India Cricketer Harbhajan Singh Corona Positive)

दरम्यान, हरभजन सिंगने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीच्या वेळी त्याने भविष्यात पंजाबची (Punjab) सेवा करायची असल्याचे सांगितले होते. मात्र, ही सेवा कशी करायची आहे, याचा खुलासा त्याने केलेला नाही.

Harbhajan Singh Corona Positive
कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, ऑस्ट्रेलियाने हिरावला नंबर वन चा ताज

भज्जीला जाणवली कोरोनाची सौम्य लक्षणे

कोरोना झाल्यानंतर भज्जीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सौम्य लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे मी स्वतःला घरातच क्वारंटाइन केले असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लवकरच चाचणी करुन घेण्याचे आवाहन करेन. कृपया सुरक्षित रहा आणि काळजी घ्या."

23 वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळलो

हरभजन सिंगने 23 वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. त्यादरम्यान त्याने एकूण 711 विकेट घेतल्या. निवृत्तीच्या वेळी, त्याने भारतीय क्रिकेटमधील 23 वर्षांचा दीर्घ प्रवास सुंदर आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले होते. भज्जी हा दोनदा विश्वचषक विजेत्या असलेल्या टीम इंडियाचा भाग होता. भारतीय संघासोबत त्याने 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

Harbhajan Singh Corona Positive
ICC Rankings: मार्नस लॅबुशेन 20 कसोटी खेळून बनला नंबर वन !

शिवाय, अनिल कुंबळेनंतर (Anil Kumble) हरभजन सिंग हा भारतासाठी 400 कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 103 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 417 विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये त्‍याच्‍या विकेटची संख्‍या 269 आहे, जी त्‍याने 236 सामन्‍यात मिळवली. याशिवाय त्याने भारताकडून खेळलेल्या 28 टी-20 सामन्यांमध्ये 25 बळी घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com