क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री खेळणार रणजी मॅच

रणजी ट्रॉफी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे मनोज तिवारी.
Manoj Tiwary
Manoj TiwaryFacebook/Manoj Tiwary
Published on
Updated on

क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडमध्ये या खेळाला जंटलमन्स गेम म्हटले जात असले तरी भारतात त्याची सुरुवात राजेशाही खेळ म्हणून झाली आहे. देशातील पहिली प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा, रणजी करंडक, नवानगरचे महाराज केएस रणजित सिंग यांच्या नावावर ठेवण्यात आली होती. 1934-35 मध्ये झालेल्या पहिल्या रणजी स्पर्धेची ट्रॉफी (Ranji trophy 2022) पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांनी दान केली होती.

आता तो काळ निघून गेला. आज क्रिकेट हा राजेशाहीच्या खेळातून सामान्य माणसाचा खेळ झाला आहे. मात्र, रणजी ट्रॉफी खेळलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत काही मंत्र्यांचीही नावे आहेत. त्यापैकी सर्वात खास म्हणजे मनोज तिवारी (Manoj Tiwary). मनोज देशातील पहिले क्रिकेटपटू ठरले ज्यांनी मंत्री म्हणून प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत (Cricket) प्रवेश करणार आहे. आज कटक येथे बाराबती स्टेडियमवर सुरू होणाऱ्या बडोद्याविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मनोज उतरणार आहे. 36 वर्षीय मनोज बंगालचे क्रीडा राज्यमंत्री आहेत. त्यांनी गेल्या वर्षीच ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्रिपद स्वीकारले.

Manoj Tiwary
IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सची कमान 'या' खेळाडूकडे

मनोज हे रणजी क्रिकेटमध्ये पूर्वीपासूनच परिचित नाव आहे. दीड दशकांहून अधिक काळातील कारकिर्दीत त्यांनाी अनेक रणजी ट्रॉफी हंगाम खेळले आहेत. मनोजने आतापर्यंत 100 रणजी सामन्यांसह 125 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 50.36 च्या सरासरीने 8,965 धावा केल्या आहेत ज्यात 27 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 303 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2020 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या बंगाल संघाचा ते महत्त्वाचे सदस्य होते. आतापर्यंत ते फक्त क्रिकेटपटू म्हणून रणजी सामने खेळले होते, मात्र या हंगामात ते मंत्री म्हणून खेळताना दिसणार आहेत.

Manoj Tiwary
IND vs WI: पहिल्या T20च्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताने जिंकला सामना!

रणजी खेळणारे मनोज बंगालमधील पहिले क्रीडा राज्यमंत्री नाही. यापूर्वी लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही रणजी खेळली आहे, मात्र मंत्री होण्यापूर्वी शुक्ला यांनी रणजी ट्रॉफी खेळली होती. राजकारणात येण्यापूर्वीच त्यांनी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. याशिवाय मनोज यांनी क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही ठिकाणी आपली खेळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील रणजी सामना खेळले आहेत. त्यांनी 2000-01 हंगामात हिमाचल प्रदेशकडून जम्मू आणि काश्मीर विरुद्ध एक रणजी सामना खेळला होता. त्या सामन्यात त्यांनी कर्णधारपदही भूषवले होते. त्यावेळी अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. आयपीएस-आयएएस झालेल्या अनेक क्रिकेटपटूंची नावेही रणजी ट्रॉफीशी जोडली गेली आहेत, त्यापैकी अमय खुरासिया आणि जोगिंदर शर्मा यांची नावे प्रामुख्याने घेतली जाते. रणजी ट्रॉफी खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये नवज्योतसिंग सिद्धू, मुहम्मद अझरुद्दीन, गौतम गंभीर, कीर्ती आझाद, अशोक दिंडा यांच्यासह सध्याच्या काळातील अनेक राजकारण्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com