ब्राझीलच्या फुटबॉलपटूवर झाला खुनाचा आरोप

सामन्यादरम्यान खेळाडूने रेफ्रीच्या डोक्यात मारली जोरदार लाथ
Football
FootballDainik Gomantak
Published on
Updated on

Football Crime: ब्राझीलच्या (Brazil) दक्षिणेतील लोअर लीग फुटबॉल सामन्यादरम्यान (Football League) एका फुटबॉल खेळाडूवर रेफ्रीच्या डोक्यात क्रूरपणे लाथ मारल्यामुळे (Crime in football match) त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात ठेवण्यात आला आहे. लोअर लीग सामन्यादरम्यान साओ पावलोचा खेळाडू विल्यम रिबेरोने गुआरानी संघाविरुद्ध रेफ्रीने त्याची चाल फॉल ठरवल्यामुळे विल्यम रिबेरोने रेफ्रीवर हल्ला करताना डोक्यावर लाथ मारली. (Referee injured)

Football
वर्ल्डकपसाठी युझवेंद्र चहल घेणार वरुण चक्रवर्तीची जागा?

सामन्याच्या फुटेजमध्ये रेफ्री रॉड्रिगो क्रिवेलारो यांनी मैदानात रिबेरोला फॉल दिल्यानंतर शेजारीच उभे असलेल्या रेफ्री रॉड्रिगो क्रिवेलारोना खाली जोरदार धक्का देऊन पडतो व त्यांच्या डोक्यावर पायाने लाथ मारून जोरदार प्रहार करतो. त्यामुळे रेफ्री क्रिवेलारो मार लागल्याने जखमी होतात. इतर खेळाडू परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे येऊन रोड्रीगोला बाजूला करतात व विव्हळणाऱ्या रेफ्री साठी फिजोला आवाज देतात.

Football
FC Goaचा तळावलीवर तीन गोल करत विजय

दुसरा हाफमध्ये झालेल्या या घटनेमुळे 14 मिनिटे खेळ थांबवण्यात आला व क्रिवेलारो यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर 'रोड्रीगोवर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्याचा निर्णय घेतला गेला. निर्णय घेताना, प्राणघातक हल्ला करणायचा प्रयत्न करण्यात आला' असे प्रभारी अधिकाऱ्याने ब्राझीलच्या पोर्टल यूओएलला सांगितले.

Football
ENG vs IND: पाचव्या कसोटीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम

साओ पावलो क्लबने या घटनेला "फुटबॉल इतिहासातील दुःखद घटना" असे संबोधले आहे आणि पुढे म्हटले आहे की, त्यांनी रिबेरोला संघातून काढून टाकले आहे आणि पुढे काय कारवाई होऊ शकते याविषयीची तपासणी सध्या करत असल्याचे सांगितले. क्लबच्या 113व्या वर्धापन दिनादिवशी ही हल्ल्याची घटना घडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com