Manchester City: रेफ्रीला गराडा घालणे मँचेस्टर सिटीला भोवले, फुटबॉल असोसिएशनकडून कारवाई

FA charged Manchester City: फुटबॉल असोसिएशनकडून मँचेस्टर सिटीवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
Erling Haaland | Manchester City
Erling Haaland | Manchester CityX/premierleague
Published on
Updated on

Football Association charged Manchester City:

रविवारी (३ डिसेंबर) प्रीमियर लीग स्पर्धेत मँचेस्टर सिटी आणि टोटेनहॅम हॉटस्पर हे संघ आमने-सामने होते. रोमांचक झालेल्या या सामन्यात 3-3 अश बरोबरी झाली. मात्र, या सामन्याच्या अखेरीस काही नाट्यमय घटना घडल्या. त्यानंतर आता मँचेस्टर सिटीला फुटबॉल असोसिएशनच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यात निर्धारितवेळेनंतरही 3-3 अशी बरोबरी होती. त्यानंतर भरपाई वेळेत खेळ सुरू असताना 94 व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडकडून जॅक ग्रिलिशला गोलची संधी होती, पण त्याचवेळी मॅच रेफ्रीने फाऊल दिल्याने ही संधी हुकली.

Erling Haaland | Manchester City
ISL Football: रॉलिनच्या गोलमुळे एफसी गोवाची सरशी; केरळा ब्लास्टर्सला एका गोलने नमवून अव्वलस्थानी विराजमान

झाले असे की हॉटस्परच्या संघाने फाऊलची मागणी केली होती, पण बॉल मँचेस्टर सिटीच्या खेळाडूकडे असल्याने रेफ्रीने फाऊल नाकारला. त्यामुळे खेळ पुढे चालू राहिला. त्यावेळी सिटीकडे गोलसाठी संधी होती. मात्र ते गोलपोस्टजवळ असतानाच रेफ्रीने सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हालंडवर फाऊलची शिट्टी वाजवली. त्यामुळे मँचेस्टर सिटीचे खेळाडूंनी रेफ्रीवर राग व्यक्त केला.

त्यावेळी एर्लिंग हालंड, रुबेन दियास, मतेओ कावासिक अशा काही खेळाडूंनी रेफ्री सायमन हुपर यांना गराडा घालून त्यांच्या निर्णयाचा विरोध केला. त्यामुळे खेळाडूंवर नियंत्रण नसल्याने मँचेस्टर सिटीला कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

Erling Haaland | Manchester City
Manchester City चे चॅम्पियन्स लीग विजयानंतर घरी जोरदार स्वागत, हजारो चाहते उतरले रस्त्यावर, पाहा Video

फुटबॉल असोसिएशनने (FA) दिलेल्या माहितीनुसार 'एफएच्या E20.1 नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी मँचेस्टर सिटीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या खेळाडूंनी टॉटेनहॅम हॉटस्परविरुद्ध प्रीमियर लीगमध्ये झालेल्या सामन्यात सामनाधिकाऱ्यांना गराडा घातला होता.'

'त्यांच्यावर आरोप आहे की सामन्याच्या 94 व्या मिनिटादरम्यान क्लबला त्यांच्या खेळाडूंनी अयोग्य वर्तवणूक करण्यापासून अडवण्यात अपयश आले. त्यामुळे गुरुवारपर्यंत मँचेस्टर सिटीला कारवाईला उत्तर द्यावे लागणार आहे.'

दरम्यान, या सामन्यात बरोबरी झाल्यानंतर मँचेस्टर सिटी प्रीमियर लीगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांचे अव्वल क्रमांकावर असलेल्या अर्सेनलपेक्षा 3 पाँइंट्स कमी आहेत. मँचेस्टर सिटीचा पुढील सामना 7 डिसेंबर रोजी ऍस्टर विलाविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com