Football India संघात गोव्याचे पाच जण

सेरिटॉन, मंदार, ब्रँडन, ग्लॅन, लिस्टन यांनी संघातील स्थान राखले
Football India
Football IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सॅफ करंडक फुटबॉल (SAFF Trophy Football) स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Coach Igor Stimac) यांनी भारताचा (Football India) 23 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात गोव्याच्या (Goa) पाच खेळाडूंनी स्थान राखले आहे. स्पर्धेला येत्या एक ऑक्टोबरपासून मालदीवमध्ये सुरवात होईल.

Football India
GAF चा पहिला सामना एकऑक्टोबर रोजी

बचावपटू सेरिटॉन फर्नांडिस, मंदार राव देसाई, मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस, ग्लॅन मार्टिन्स व लिस्टन कुलासो हे गोमंतकीय फुटबॉलपटू सॅफ करंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. नेपाळविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात हे पाचही खेळाडू होते, त्यापैकी सेरिटॉनने नेपाळविरुद्ध पदार्पण केले होते. भारतीय संघातील खेळाडू सोमवारी (ता. 27) बंगळूर येथे जमा होतील आणि मंगळवारी मालदीवला रवाना होतील, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने रविवारी जाहीर केले.

स्पर्धेत भारताव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका व यजमान मालदीव या संघांचा समावेश आहे. पूर्वी ही स्पर्धा सार्क कप नावाने खेळली जात असेल. एकंदरीत सात वेळा भारतीय संघ स्पर्धेत विजेता ठरला आहे. यामध्ये 1993 (लाहोर), 1997 (काठमांडू), 1999 (मडगाव), 2005 (कराची), 2009 (ढाका), 2011 (नवी दिल्ली), 2015-16 (तिरुवनंतपुरम) मधील स्पर्धांचा समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ चार ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध, सात ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध, दहा ऑक्टोबरला नेपाळविरुद्ध, तर 13 ऑक्टोबरविरुद्ध मालदीवविरुद्ध खेळेल.

Football India
सुशिक्षित देशांनी भारताचे अनुकरण करु नये, शाहिद आफ्रिदीची आगपाखड

भारतीय संघ पुढीलप्रमाणे: -

गोलरक्षक ः गुरप्रीत सिंग, अमरिंदर सिंग, विशाल कैथ, बचावपटू ः प्रीतम कोटल, सेरिटॉन फर्नांडिस, चिंग्लेन्साना सिंग, राहुल भेके, सुभाशिष बोस, मंदार राव देसाई, मध्यरक्षक ः उदांता सिंग, ब्रँडन फर्नांडिस, लालेंगमाविया, अनिरुद्ध थापा, सहल अब्दुल समद, जीक्सन सिंग, ग्लॅन मार्टिन्स, सुरेश सिंग, लिस्टन कुलासो, यासीर महम्मद, आघाडीपटू ः मनवीर सिंग, रहीम अली, सुनील छेत्री, फारुख चौधरी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com