Finn Allen: 16 सिक्सची बरसात अन् 137 धावा ! ऍलेनने पाकिस्तानी गोलंदाजांना चोपत रचले नवे विक्रम

New Zealand vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या फिन ऍलेनने 16 षटकारांसह ताबतोड शतकी खेळी करत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे
Finn Allen
Finn AllenX/ICC
Published on
Updated on

Finn Allen hits 137 runs with 16 sixes during New Zealand vs Pakistan 3rd T20I match:

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात चालू असेलल्या टी20 मालिकेतील तिसरा सामना ड्युडेडिनला पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 45 धावांनी विजय मिळवताना मालिकेतही 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. दरम्यान न्यूझीलंडच्या या विजयात फिन ऍलेनच्या ताबडतोड शतकी खेळीचा मोठा वाटा राहिला. त्याने काही विक्रमही नावावर केले आहेत.

या सामन्यात न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. त्यांच्याकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या फिन ऍलेनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. डेवॉन कॉनवेची विकेट चौथ्या षटकात गेली होती.

पण एका बाजूने आक्रमक खेळणाऱ्या ऍलनला टीम सिफर्टने चांगली साथ दिली. त्यांच्यात 125 धावांची शतकी भागीदारीही झाली, ज्यात सिफर्टने 31 धावांचे योगदान दिले.

ऍलेनने तुफानी फटकेबाजी करताना 62 चेंडूत 5 चौकार आणि तब्बल 16 षटकारांची बरसात करत 137 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्याला 18 व्या षटकात झमान खानने त्रिफळाचीत केले. तोपर्यंत न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा पार केला होता.

Finn Allen
Kane Williamson: न्यूझीलंडला धक्का! T20I मालिकेतून कर्णधारच झाला बाहेर, 'या' खेळाडूला संधी

दरम्यान, ऍलेनची ही खेळी विक्रमी ठरली. त्याने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

हा विश्वविक्रम याआधी केवळ अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झझाईच्या नावावर होता. त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध डेहराडूनला झालेल्या सामन्यात नाबाद 162 धावांची खएळी करताना 16 षटकार खेचले होते.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू (पुरुष) (17 जानेवारी 2024 पर्यंत) -

  • 16 षटकार - हझरतुल्ला झझाई (अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, 2019)

  • 16 षटकार - फिन ऍलेन (न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, 2024)

  • 15 षटकार - झीशन कुकिहेल (हंगेरी विरुद्ध ऑस्ट्रिया, 2022)

  • 14 षटकार - ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, 2013)

  • 14 षटकार - जॉर्ज मुन्सी (स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स, 2019)

Finn Allen
IND vs AFG: ...तर रोहित कॅप्टनकूल धोनीचा विक्रम मोडेलच, पण भारताचा सर्वात यशस्वी T20 कर्णधारही ठरणार

न्यूझीलंडसाठीही ऍलेनचा विक्रम

ऍलेन त्याच्या 137 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारा पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 12 वर्षांपूर्वीचा ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम मोडला आहे.

2012 साली मॅक्युलमने बांगलादेशविरुद्ध 72 चेंडूत 123 धावांची खेळी केली होती. तसेच या या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही मॅक्युलम असून त्याने 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 56 चेंडूत 116 धावांची नाबाद खेळी केली होती.

याशिवाय ऍलेन न्यूझीलंकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ग्लेन फिलिप्स असून त्याने 46 चेंडूत शतक केले होते, तर दुसऱ्या क्रमांकावर कॉलिन मुनरो आहे, त्याने 47 चेंडूत शतक केले आहे.

न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणारे पुरुष क्रिकेटपटू -

  • 137 धावा - फिन ऍलेन (विरुद्ध पाकिस्तान, 2024)

  • 123 धावा - ब्रेंडन मॅक्युलम (विरुद्ध बांगलादेश, 2012)

  • 116* धावा - ब्रेंडन मॅक्युलम (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2010)

  • 109* धावा - कॉलिन मुनरो (विरुद्ध भारत, 2017)

  • 108 धावा - ग्लेन फिलिप्स (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2020)

न्यूझीलंडचा विजय

या सामन्यात ऍलेनच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 224 धावा उभारल्या. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 179 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने 58 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com