Emiliano Martinez
Emiliano MartinezDainik Gomantak

Emiliano Martinez: 'माझं नेहमीच स्वप्न...', भारतात पोहचताच अर्जेंटिनाचा विश्वविजेता खेळाडू भारावला

Video: अर्जेंटिनाचा स्टार गोलकिपर मार्टिनेझ सध्या भारत दौऱ्यावर आहे.

Emiliano Martinez arrives in Kolkata, India: फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या अर्जेंटिना संघाचा स्टार गोलकिपर एमिलियानो मार्टिनेझ भारत दौऱ्यावर आला आहे. तो सोमवारी (3 जुलै) कोलकाताला पोहोचला आहे.

मार्टिनेझचा दोन दिवसाचा भारत दौरा मंगळवारपासून सुरू होत आहे. तो कोलकातामधील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी उतरला. त्यावेळी त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. त्यानेही भारतात येण्यासाठी तो उत्सुक होता, असे त्याने सांगितले.

कोलकातामध्ये आल्यानंतर मार्टिनेझने पत्रकारांना सांगितले की 'मी खूप उत्सुक आहे. मला छान वाटत आहे. भारतात येणे नेहमीच माझे स्वप्न होते. मी भारतात येईल असे वचन दिले होते आणि मी इथे येऊन आनंदी आहे.'

Emiliano Martinez
Argentina: कल्ला होणारच! तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकप अर्जेंटिनात, पाहा राजधानीतील थक्क करणारी दृश्य

मार्टिनेझ त्याच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तो मंगळवारी दुपारपासून विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यास सुरुवात करेल. तो सर्वात आधी 'तहादेर कथा' या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान तो बिस्वा बांगला मेला प्रंगनमध्ये शालेय मुलांशी संवाद साधेल.

त्यानंतर तो मोहन बगानच्या मैदानात जाईल, तिथे तो बंगालमधील १० गोलकिपर्सला सन्मानित करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर रिपोर्ट्सनुसार तो मोहन बगान क्लबमधील पेले, दियागो मॅरेडोना आणि गारफिल्ड सोबर्स यांच्या नावाच्या गेटच्या उद्घाटनासाठीही उपस्थित राहिल.

Emiliano Martinez
Argentina Team in India: मेस्सी अन् सुनील छेत्री आमने-सामने आले असते, अर्जेंटिनाने प्रस्तावही दिलेला; पण...

याशिवाय तो मोह बगान ऑल स्टार्स आणि कोलकाता पोलिस ऑल स्टार्स यांच्यात होणाऱ्या प्रदर्शनिय सामन्यासाठीही उपस्थित राहिल. तो श्रीभूमी क्लबला भेट देणार आहे, तर संतोष मित्रा स्क्वनेअरमध्ये फुटबॉल क्लिनिकच्या कार्यक्रमासाठीही उपस्थित राहिल.

मार्टिनेझ बांगलादेशची राजधानी ढाका येथे भेट दिल्यानंतर भारत दौऱ्यावर आला आहे. त्याने तिथे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचीही भेट घेतली होती.

मार्टिनेझने जिंकला गोल्डन ग्लव्ज

कतारला गेल्यावर्षी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले होते. या सामन्यात मार्टिनेझची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. त्याने अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपरचा गोल्डन ग्लव्ह्ज हा पुरस्कारही जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com