FIFA 2026 World Cup logo: फिफाने 2026 च्या विश्वचषकासाठी नवीन लोगो केला जारी

FIFA ने 2026 FIFA विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत लोगोचे अनावरण केले आहे. नवीन लोगो 18 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे, जो मागील लोगोपेक्षा अधिकच आकर्षक दिसत आहे.
FIFA Unveils 2026 World Cup Logo
FIFA Unveils 2026 World Cup LogoTwitter / @LosAngelesFWC26

FIFA Unveils 2026 World Cup logo: आगामी फिफा विश्वचषक 2026 मध्ये होणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होणाऱ्या पुढील विश्वचषक स्पर्धेची तयारी आतापासूनच जोरात सुरु झाली आहे.

दरम्यान, FIFA ने 2026 FIFA विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत लोगोचे अनावरण केले आहे. नवीन लोगो 18 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे, जो मागील लोगोपेक्षा अधिकच आकर्षक दिसत आहे.

पुढील FIFA विश्वचषक 2026 कुठे होणार आहे?

FIFA ने अलीकडेच FIFA 2026 विश्वचषकाबाबत जाहीर केले होते की, 2026 च्या सीझनचे आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा (Canada) करणार आहेत.

फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. या दरम्यान एकूण 104 सामने होणार असून यामध्ये 48 संघ सहभागी होणार आहेत.

FIFA Unveils 2026 World Cup Logo
FIFA World Cup 2026 चे Schedule जाहीर, या दिवशी खेळवला जाणार अंतिम सामना

अर्जेंटिनाने 2022 चे विजेतेपद पटकावले होते

गेल्या वर्षी 2022 मध्ये, कतारमध्ये फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 32 संघ सहभागी झाले होते.

यादरम्यान 29 दिवसांत एकूण 64 सामने खेळले गेले. अंतिम फेरीत फ्रान्सचा (France) पराभव करुन अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले.

या विजयासह लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे, तो 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' खेळाडूही ठरला होता. त्याला 'गोल्डन बॉल' पुरस्कार मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com