FIFA ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला केले निलंबित, जाणून घ्या काय आहे प्रकरण

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (FIFA) ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
FIFA Suspends AIFF
FIFA Suspends AIFF Twitter
Published on
Updated on

FIFA Suspends AIFF : भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल (FIFA) ने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. एवढेच नाही तर ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 चे यजमानपदही FIFA ने हिसकावून घेतले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे.

FIFA Suspends AIFF
FIFA World Cup 2022 या दिवशी होणार सुरू, कतार संघाच्या सामन्याने होणार सुरुवात

"निलंबनाबाबत फिफाने सांगितले की, "एआयएफएफ कार्यकारी समितीचे अधिकार ताब्यात घेण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याच्या आदेशानंतर निलंबन मागे घेण्यात येईल आणि एआयएफएफ प्रशासनाचे दैनंदिन कामकाजावर पूर्ण नियंत्रण राहील. ''

तृतीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 16 ऑगस्ट म्हणजे आजपासून कोलकातामध्ये ड्युरंड चषक स्पर्धा सुरू होत आहे. यामध्ये बंगळुरू एफसीचा संघ जमशेदपूर एफसीशी भिडणार आहे. ऑगस्टच्या सुरुवातीस, फिफाने तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल एआयएफएफला निलंबनाचा इशारा दिला होता. मात्र आता सर्वांच्या सहमतीनंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले.

FIFA Suspends AIFF
Independence Day: टीम इंडियाने हरारेमध्ये फडकवला तिरंगा

नुकतेच भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने निलंबनाबाबत वक्तव्य केले होते. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंना फिफाचा इशारा गांभीर्याने घेऊ नका असे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, छेत्रीने खेळाडूंना फक्त त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com