फायनलमधील राडा भोवला! FIFAची मोठी ॲक्शन, 4 खेळाडूंवर निलंबनाची कारवाई; अर्जेंटिनाच्या स्टारवर 10 सामन्यांची बंदी

FIFA action Argentina players: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये झालेली बाचाबाची आता संघाला चांगलीच महागात पडली आहे.
FIFA action Argentina players
FIFA action Argentina playersDainik Gomantak
Published on
Updated on

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंमध्ये झालेली बाचाबाची आता संघाला चांगलीच महागात पडली आहे. मैदानावरील गैरवर्तनाची दखल घेत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात FIFAने अर्जेंटिनाच्या काही खेळाडूंवर तसेच कोचिंग स्टाफवर कठोर कारवाई केली आहे. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंद्रो पारेडेस याच्यावर तब्बल 10 सामन्यांची बंदी घालण्यात आली असून ही FIFAच्या निर्णयांमधील अत्यंत कठोर शिक्षांपैकी एक मानली जात आहे.

पारेडेसवर सर्वाधिक कठोर कारवाई

अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळात लिआंद्रो पारेडेसने स्पेनच्या खेळाडूंशी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप आहे. FIFAच्या तपासानुसार त्याने एरिक गार्सियाचा गळा पकडला आणि स्पेनचा स्टार मिडफिल्डर गावी याला जमिनीवर ढकलल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पारेडेसला 10 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्यावर 90 हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या बंदीचा अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघावर मोठा परिणाम होऊ शकतो. FIFAच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार जून 2027 पर्यंत अर्जेंटिनाचे जवळपास 10 सामने होणार आहेत. त्यामुळे पारेडेसला पुढील अनेक सामन्यांपासून संघाबाहेर राहावे लागू शकते. विशेष म्हणजे, यातील बहुतांश सामने मैत्रीपूर्ण असण्याची शक्यता आहे.

FIFA action Argentina players
Goa BJP: भाजपचे निवडणूक रणशिंग, मुख्यमंत्र्यांनी तपासले मंत्र्यांचे साडेचार वर्षांतील विकासकामांचे प्रगतिपुस्तक

मोलिना आणि अल्माडालाही शिक्षा

FIFAने केवळ पारेडेसवरच कारवाई केलेली नाही. अर्जेंटिनाचा डिफेंडर नाहुएल मोलिना याच्यावर सात सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावरही 90 हजार डॉलरचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. दुसरीकडे थियागो अल्माडा याला एका सामन्याच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याला 30 हजार डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.

अर्जेंटिनाच्या कोचिंग स्टाफमधील रॉबर्टो अयाला यांच्यावरही FIFAने कारवाई केली आहे. त्यांना तीन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून 30 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.

स्पेनच्या गावीवरही FIFAची कारवाई

या घटनेत अर्जेंटिनाच्या खेळाडूंवरच कारवाई झालेली नाही. स्पेनचा मिडफिल्डर गावी यालाही एका सामन्याच्या निलंबनाची शिक्षा मिळाली आहे. त्याची ही बंदी 26 सप्टेंबर रोजी वेम्बली येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या नेशन्स लीग सामन्यात लागू होणार आहे.

फायनलनंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचा FIFAने सविस्तर आढावा घेतल्यानंतर हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विश्वचषकातील मैदानावरील संघर्षाचे पडसाद आता पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत उमटणार आहेत.

FIFA action Argentina players
Goa Politics: पक्षांतराची हॅट्‌ट्रिक पुन्हा शक्य, सरदेसाईंची काँग्रेसवर टीका; युतीचा विशेष फायदा नाही!

अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनलाही मोठा दंड

FIFAने अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनवरही एकूण 1.10 लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. विश्वचषकादरम्यान घडलेल्या विविध घटनांचा या कारवाईत समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीनंतर फॉकलंड बेटांशी संबंधित राजकीय बॅनर प्रदर्शित केल्याचा तसेच चाहत्यांकडून भेदभावपूर्ण घोषणाबाजी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

याशिवाय AFAला वंशवादविरोधी प्रकल्पांसाठी 1 लाख डॉलर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंसोबतच अर्जेंटिनाच्या फुटबॉल प्रशासनालाही FIFAच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

अर्जेंटिना FIFAच्या निर्णयाला आव्हान देणार

FIFAच्या या कठोर निर्णयानंतर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने अपील करण्याची भूमिका घेतली आहे. AFAचा कायदेशीर विभाग प्रथम FIFAकडून कारवाईमागील सविस्तर कारणे मागवणार आहे. त्यानंतर FIFAच्या अपील समितीसमोर दाद मागितली जाणार आहे. आवश्यक असल्यास क्रीडा लवादाच्या न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याचे AFAने संकेत दिले आहेत.

FIFA action Argentina players
Goa Politics: पक्षांतराची हॅट्‌ट्रिक पुन्हा शक्य, सरदेसाईंची काँग्रेसवर टीका; युतीचा विशेष फायदा नाही!

अंतिम सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

न्यू जर्सीतील ईस्ट रदरफोर्ड येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनच्या फेरान टोरेसने निर्णायक गोल केला. सामन्यादरम्यान अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला लाल कार्डही दाखवण्यात आले होते.

सामना संपल्यानंतर मात्र मैदानावरील वातावरण अचानक तापले. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद आणि धक्काबुक्की झाली. FIFAने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशी केली आणि आता त्याचा निकाल अर्जेंटिनासाठी मोठा धक्का ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com