पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत पहिल्याच लढत जिंकली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात पूर्ण तीन गुणांच्या उद्दिष्टाला बळ प्राप्त झाले आहे. असे मत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी बुधवारी व्यक्त केले. चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या आगामी लढतीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
(FC Goa won their first match in the ISL football tournament )
चेन्नईयीन एफसी संघ कठीण प्रतिस्पर्धी आहे. पुढील सामना दोन्ही संघांसाठी खडतर असेल. आम्ही पूर्ण तीन गुणांचे उद्दिष्ट बाळगून धैर्याने लढू, असा विश्वासही पेनया यांनी व्यक्त केला. संघातील खेळाडूंचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. एफसी गोवा आणि चेन्नईयीन यांच्यातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामना शुक्रवारी (ता. 21) चेन्नई येथे होणार आहे.
एफसी गोवाचा हा यंदाच्या आयएसएल स्पर्धेतील हा सलग दुसरा सामना असेल. पहिल्या लढतीत त्यांनी कोलकाता येथे ईस्ट बंगालला 2-1 फरकाने नमविल होते. चेन्नईयीनने मागील दोन लढतीतून चार गुणांची कमाई केली आहे. कोलकाता येथे एटीके मोहन बागानला 2-1 असा पराभवाचा धक्का दिल्यानंतर, घरच्या मैदानावर चेन्नईयनने बंगळूरला 1-1 असे बरोबरीत रोखून गुण विभागून घेतला.
प्रतिस्पर्धी तुल्यबळ
एफसी गोवाच्या प्रतिस्पर्ध्यांविषयी पेनया म्हणाले, ‘‘चेन्नईयीन हा एक तुल्यबळ संघ आहे. ते चांगले खेळत आहेत. आम्हीही सज्ज आहोत. दोन्ही संघांसाठी पुढील लढत खडतर असेल याची जाणीव आहे. ईस्ट बंगालविरुद्धचा विजय आता इतिहासजमा झाला आहे, आता आम्ही पूर्ण लक्ष चेन्नईयीनविरुद्धच्या लढतीवर केंद्रित केले आहे.’’ गतमोसमात एफसी गोवाने चेन्नईयीनविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले होते.
महत्त्वाचा विजय
ईस्ट बंगालविरुद्ध एफसी गोवाचा प्रशिक्षक या नात्याने पहिलाच सामना जिंकल्यामुळे खूष असून तो विजय महत्त्वाचा आहे, असे मत एफसी गोवाच्या माजी बचावपटूने व्यक्त केले. चेन्नईयीनविरुद्ध संघातील सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याची माहितीही त्यांनी दिली. परदेशी खेळाडू मोरोक्कन नोह सादौई संघासाठी खूप मौल्यवान खेळाडू असल्याचे मत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.