ISL Football: केरळचा धडाका कायम राहणार की एफसी गोवा 'अजिंक्य' ठरणार

आयएसएल फुटबॉल : कोची येथे आज केरळा ब्लास्टर्सचे कठीण आव्हान
ISL Football
ISL FootballDainik Gomamntak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना जास्त कठीण ठरू शकतो, असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांना वाटते. त्या पार्श्वभूमीवर ते रविवारी (ता. 13) होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

(FC Goa will play against Kerala Blasters in the ISL Football tournament)

एफसी गोवा व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. चारपैकी तीन सामने जिंकलेल्या एफसी गोवाचे सध्या नऊ गुण आहेत. कोची येथे जिंकल्यास त्यांना दुसऱ्या क्रमांकाची संधी राहील. सलग दहा सामने केरळा ब्लास्टर्सला गोव्यातील संघावर विजय नोंदविता आलेला नाही.

ISL Football
PAK vs ENG Final: पाकिस्तान... क्रिकेटच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध 'धर्मयुद्ध'?

‘‘कोची येथे खेळण्यासाठी पूर्ण विश्वासाने आलो आहोत, लढत सोपी नसेल याची आम्हाला जाणीव आहे. सारं काही सोपं आहे असं वाटत असल्यास ती आमची मोठी चूक ठरेल. केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा सामना खूपच कठीण असेल व आम्हाला त्यासाठी सज्ज राहावे लागेल,’’ असे पेनया सामन्यापूर्वी म्हणाले. कोचीतील केरळा ब्लास्टर्सच्या पाठीराख्यांची उत्स्फूर्त संख्या आणि त्यांची खेळण्याची आक्रमक शैली निर्णायक ठरू शकते असे एफसी गोवाच्या प्रशिक्षकास वाटते.

ISL Football
Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणाला...

केरळा ब्लास्टर्सने स्पर्धेतील पहिल्याच लढतीत ईस्ट बंगालला हरविले, नंतर सलग तीन पराभवानंतर त्यांनी मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडवर मात केली. तोच धडाका एफसी गोवाविरुद्ध घरच्या मैदानावर कायम राहण्यासाठी इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघ प्रयत्नशील असेल. सध्या त्यांचे पाच लढतीनंतर सहा गुण आहेत.

  • एकूण सामने 16, एफसी गोवा विजयी 9, केरळा ब्लास्टर्स विजयी 3, बरोबरी ४

  • 2197 दिवसांपूर्वी एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सविरुद्ध शेवटचा पराभव

  • 13 नोव्हेंबर 2016 रोजी केरळा ब्लास्टर्सचा एफसी गोवावर 2-1 फरकाने विजय

  • आयएसएल स्पर्धेत 100 सामने खेळणारा एफसी गोवाचा सेरिटन फर्नांडिस 16 खेळाडू बनेल

  • एफसी गोवा व केरळा ब्लास्टर्स यांच्यातील लढतींत आतापर्यंत 63 गोल, एकही गोलशून्य बरोबरी नाही

  • उभय संघांतील मागील सलग 3 लढती बरोबरीत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com