ISL Football: एफसी गोवा VS हैदराबाद एफसी हॅटट्रिक कोणाची? उत्सुकता शिगेला

दोन्ही संघाचे लक्ष्य विजयी हॅटट्रिक हेच
ISL Football
ISL FootballDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (ता. 29) एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी आमनेसामने असतील, त्यावेळी दोन्ही संघाचे लक्ष्य विजयी हॅटट्रिक हेच असेल. हैदराबादमधील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर रंगतदार लढत अपेक्षित आहे.

(FC Goa vs Hyderabad FC will be played in the Indian Super League football tournament )

एफसी गोवाचा हा सलग तिसरा सामना आहे. अगोदरच्या लढतीत त्यांनी अनुक्रमे ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसीला नमविले. गतविजेते हैदराबादही अपराजित आहेत. पहिल्याच लढतीत त्यांनी मुंबई सिटीला गोलबरोबरीत रोखले, नंतर नॉर्थईस्ट युनायटेड व बंगळूर एफसीला नमवून आगेकूच राखली. सध्या हैदराबादचे सात, तर एफसी गोवाचे सहा गुण आहेत.

ISL Football
Suryakumar Yadav: मोहम्मद रिझवानची बादशाहत संपली, टी-20 क्रिकेटमध्ये सूर्याने गाठले हे स्थान

एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया पहिल्या दोन विजयामुळे खूष आहेत, त्याचवेळी आपल्या संघाला अजून सुधारणेचे गरजही त्यांनी प्रतिपादली. ‘‘सध्याच्या सहा गुणांमुळे मी खूष आहे. जिंकणे नेहमीच कठीण असते, तरीही आम्हाला काही बाबतीत सुधारणा करायची आहे.

नवा प्रशिक्षक, बरेच नवे खेळाडू यासह आम्ही नव्या मोसमाला सुरवात करत आहोत. आमच्या संकल्पनेनुसार संघ बांधणी होत आहे. खेळाडूंच्या मानसिकतेनुसार जिंकणे सोपे ठरते,’’ असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी सांगितले.

ISL Football
T20 World Cup: 'भारत पुढच्या आठवड्यात परत येईल...', शोएब अख्तर असं का म्हणाला

हैदराबाद एफसी संघ अपराजित असला, तरी त्यांचे प्रशिक्षक मानोला मार्केझ यांनीही आपल्या संघात सुधारणेची गरज प्रतिपादली. त्यांनी तीन लढतीत सात गोल केले आहेत. त्यांच्या बार्थोलोम्यू ओगबेचे व व्हिक्टर जुवाव यांनी यंदा स्पर्धेत प्रत्येकी दोन गोल केले आहे. गतमोसमात हैदराबादने एफसी गोवास 3-2 फरकाने नमविले होते. तेव्हा ओगबेचे याने दोन, तर जुवाव याने एक गोल केला होता.

आकडेवारीत सामना

  • एफसी गोवा व हैदराबाद यांच्यात 6 आयएसएल लढती

  • एफसी गोवाचे 3, तर हैदराबादचा 1 विजय, बरोबरी 2

  • गतमोसमात 18 डिसेंबर 2021 रोजी 1-1 बरोबरी

  • 19 फेब्रुवारी 2022 रोजी हैदराबाद 3-2 फरकाने विजयी

  • उभय संघांत आतापर्यंत 16 गोल, एक लढत गोलशून्य बरोबरीत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com