FC Goa defeats Kerala Blasters
FC Goa defeats Kerala BlastersDainik Gomantak

एफसी गोवाचा केरळा ब्लास्टर्सला धक्का

डेव्हलपमेंट लीग : हैदराबादचा मोठा विजय, मुंबई सिटीवर नामुष्की
Published on

पणजी : केरळा ब्लास्टर्सची रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतील विजयी घोडदौड बुधवारी एफसी गोवाने खंडित केली. शेवटच्या पाच मिनिटास दोन गोल स्वीकारल्यामुळे केरळमधील संघाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद एफसीने मोठा विजय नोंदिताना मुंबई सिटीवर पाच गोल डागले. (FC Goa defeats Kerala Blasters)

FC Goa defeats Kerala Blasters
IPL 2022: '...चांगली कामगिरी करतोय', तिलक वर्माने यशाच्या रहस्याचा केला खुलासा

बाणावली येथील मैदानावर जोव्हियल डायस दोन आणि ब्रायसन फर्नांडिसच्या एका गोलमुळे एफसी गोवाने स्पर्धेतील धक्कादायक विजयाची नोंद केली. त्यांनी पिछाडीवरून सामना जिंकला. त्यांचा हा स्पर्धेतील दुसराच विजय असून सात गुण झाले आहेत. सलग चार सामने जिंकलेल्या केरळा ब्लास्टर्सला पहिल्या पराभवामुळे दुसऱ्या स्थानी घसरावे लागले. त्यांचे 12 गुण कायम असून पहिल्या क्रमांकावरील बंगळूर एफसीचे 15 गुण आहेत.

सामन्याच्या 20व्या मिनिटास निहाल सुदीश याने केरळा ब्लास्टर्सचे गोलखाते उघडले. नंतर 42व्या मिनिटास जोव्हियल डायसच्या गोलमुळे विश्रांतीपूर्वी एफसी गोवास बरोबरी साधता आली. सामन्याच्या 85व्या मिनिटास जोव्हियलने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केल्यामुळे एफसी गोवास आघाडी मिळाली. 89व्या मिनिटास ब्रायसन फर्नांडिसने गोल केल्यामुळे एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

मुंबई सिटीचा सलग पाचवा पराभव

नागोवा मैदानावर हैदराबाद एफसीने पाच गोल केल्यामुळे मुंबई सिटीवर सलग पाचव्या पराभवाची नामुष्की आली. हैदराबादचा हा दुसरा विजय असून पाच लढतीनंतर त्यांचे सात गुण झाले आहेत. स्पर्धेत तब्बल 16 गोल स्वीकारलेला, पण एकही गोल न केलेला मुंबई सिटी संघ शून्य गुणांसह तळात राहिला. हैदराबादच्या विजयात जोसेफ सनी याने 12व्या, कौस्तव दत्ता याने 14व्या मिनिटास पेनल्टीवर, पी. ए. अभिजित याने 19व्या, बदली खेळाडू क्रेस्पो वनलालह्रियातपुईया याने 88व्या, तर बिष्णू बोर्डोलोई याने 90व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com