Euro cup: इटलीची अंतिम फेरीत धडक, तर कोपामध्ये ब्राझील- अर्जेंटीना आमने सामने

कालचा दिवस ‘सुपर फुटबॉल डे’ सारखाच होता. इटलीने स्पेनला हरवत अंतिम सामन्यात धडक मारली तर कोपा अमेरिकन फुटबॉल (Football) स्पर्धेत ब्राझीलच्या संघाने पेरुला 1-0 अशी मात केली आहे.
युरो कपमध्ये इटलीची अंतिम फेरीत धडक तर  ब्राझीलने पेरुला नमवत कोपा स्पर्धेची अंतिम गाठली आहे.
युरो कपमध्ये इटलीची अंतिम फेरीत धडक तर ब्राझीलने पेरुला नमवत कोपा स्पर्धेची अंतिम गाठली आहे. Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

युरो कपचा (Euro cup) थरार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. काल झालेल्या रोमांचक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इटलीने (Italy) स्पेनला (Spain) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असे हरवत युरो कपच्या अंतिम (Final) सामन्यात धडक मारली आहे. कालचा दिवस ‘सुपर फुटबॉल डे’ सारखाच होता. युरो कपमध्ये इटलीने स्पेनला हरवत अंतिम सामन्यात धडक मारली तर दुसरीकडे कोपा अमेरिकन फुटबॉल (Football) स्पर्धेत फुटबॉलचे हिरो अशी ओळख असलेल्या ब्राझीलच्या (Brazil) संघाने पेरुला 1-0 अशी मात देत कोपा अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.

इटली आणि स्पेन या कट्टर प्रतिस्पर्ध्यामधील उपांत्य लढत शेवटपर्यंत चाहत्यांचा श्वास रोखून धरणारी अशी होती. सामन्यातील 90 मिनिटांत दोन्ही संघांनी आपले वर्चस्व राखत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळात देखील दोन्ही संघांनी आपला खेळ उंचावत ही बरोबरी कायम ठेवली. त्यामुळे हा खेळ पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. तेथे स्पेन इटलीवर मात करणार असे चित्र पहिल्या दोन पेनल्टी किकमध्ये दिसत होते. 2008 च्या युरो कप स्पर्धेत स्पेनने इटलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले होते.

युरो कपमध्ये इटलीची अंतिम फेरीत धडक तर  ब्राझीलने पेरुला नमवत कोपा स्पर्धेची अंतिम गाठली आहे.
EURO 2020 quarterfinals: स्पेन, इटली, इंग्लंड, बेल्जियम यांना उपांत्य फेरीचे वेध

पण यावेळी आलेली संधी स्पेनने सोडली आधी डॅनी ओलमो आणि नंतर मोराटाने पेनल्टी किक मिस केल्याने इटलीचा विजय पक्का झाला आणि इटलीने स्पेनवर 4-2 असा विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. इटलीच्या या विजयामुळे 1968 पासून स्वप्नवत असलेला युरो कप आता त्यांच्यापासून एका पावलावर आहे. आज इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यामधील विजेत्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल.

ब्राझील विरुध्द अर्जेंटीना यांच्यात कोपा स्पर्धेची अंतिम लढत

युरोसोबतच फुटबॉलमध्ये दुसरीकडे कोपा अमेरिकन स्पर्धेचा थरार रंजक वळणार पोहोचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फुटबॉल विश्वात अधिराज्य गाजविणारे दोन संघ समोरा समोर उभे ठाकणार आहेत. या स्पर्धेत काल ब्राझीलने पेरुला 1-0 अशी धूळ चारत कोपा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या आधीच अर्जेंटीनाने स्पर्धेच्या अंतिफेरीत स्थान मिळविले आहे. त्यामुळे आता ब्राझील विरुध्द अर्जेंटीना यांच्यात कोपा स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com