Euro 2020 Final
Euro 2020 Finaltwitter/@MayorofLondon

Euro 2020 Final: राडा घालणाऱ्या 49 चाहत्यांना अटक, 19 पोलीस जखमी

इंग्लंड आणि इटली यांच्यात झालेल्या Euro 2020 Finalमध्ये प्रक्षकांनी मोठा राडा घातल्याचे पहायला मिळाले.
Published on

रविवारी इटली आणि इंग्लंड यांच्यात युरो 2020 च्या फायनल सामन्यासाठी वेम्बली स्टेडियमजवळ दोन गटांत झालेल्या मोठ्या गोंधळानंतर ब्रिटिश पोलिसांनी 49 जणांना अटक केली. तर या घटनेत 19 पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे समजते आहे. (Euro 2020 Final: 49 rioting fans arrested and 19 officials injured)

सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. या गोँधळात लोकांनी सुरक्षेसाठी असलेल्या बॅरिकेट्स तोडले आहेत. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, “आम्ही दिवसभरात विविध गुन्ह्यांत 49 लोकांना अटक केली आहे.”

Euro 2020 Final
'ड्रॅगनला' अमेरिकेने खडसावले !

गोंधाळाच्या वेगवेगळ्या घटनांसहबत सेंट्रल लंडनमध्ये रेल्वे स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये गाण्यांच्या आवाजात गोंधळ घालत हजारो लोक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झाले होते.

सामन्याच्या सुमारे दोन तास आधी, स्टेडीयममध्ये दाखल झालेल्या चाहत्यांनी पेरीमीटर जवळ बाटल्या फेकल्या. काही सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला करण्यात आला, साक्षीदारांनी माध्यमांना सांगितले की, प्रवेशद्वारावर ऑर्डर पुनर्संचयित केल्यावर स्टेडियममध्ये २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबविण्यात आले. मैदानाच्या बाहेर हजारो चाहत्यांनी एन्ट्री पॉइंटच्या शेजारी रिकाम्या बिअर फेकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com