Eng Vs Ind: चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाची आघाडी

दुसऱ्या दिवस अखेर भारत बिनबाद ४२ धावा (Eng Vs Ind)
Eng Vs Ind: 4th Test Day 2 Score card
Eng Vs Ind: 4th Test Day 2 Score cardDainik Gomantak

Eng Vs Ind: चौथ्या कसोटीत (4th Test Match) नाणेफेक जिंकून इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root) याने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले, मात्र भारताचा पहिला डाव 191 धावांत रोखण्यात इंग्लंड गोलंदाज यशस्वी ठरले. पण इंग्लंड संघाची फलंदाजी सुद्धा पहिल्या डावात कोसळली व पहिल्या दिवसाच्या समाप्ती नंतर इंग्लंड संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 झाली.

भारत विरुध्द इंग्लंड यांच्या ओव्हल (Oval) येथे सुरु असलेल्या ४थ्या कसोटी सामन्याच्या आज दुसऱ्या खेळाच्या दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झाला तेव्हा इंग्लंड फलंदाजांची देखील सुरवतीला पडझड झाली. कालचा नाबाद फलंदाज क्रेग ओव्हरटन अवघ्या 1 धावेवर उमेश यादवच्या (Umesh Yadav) गोलंदाजीवर बाद झाला, सामन्याच्या पहिल्या दिवशी फॉर्म मध्ये असलेला डेव्हिड मलान 31 (Devid Malan) धावांवर असताना त्यालाही उमेश यादवने रोहित शर्माकडे (Rohit Sharma) झेल देण्यास भाग पडले.

Eng Vs Ind: 4th Test Day 2 Score card
ENG vs IND: रक्ताने जखमी तरीही तो मैदानावर,जेम्स अँडरसनची अनोखी खेळाडू वृत्ती

त्यानंतर मात्र ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडचा डाव बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 46 व्या षटकात 37 धावांवर सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेला अष्टपैलू मोईन अलीने ओली पोपला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला पण 35 धावांवर त्याला जडेजाने बाद केले. इंग्लंड तर्फे सर्वाधिक धावा बनवणारा ओली पोप वैयक्तिक 81 धावा करून शार्दुल ठाकूर च्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकणार नाही असे वाटत असताना, इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने संघाला बऱ्यापैकी मजल मारून दिली. शेवटी बाद होणारा फलंदाज क्रिस वोक्स याने 50 धावा केल्या. इंग्लंड संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. इंग्लंड संघाने सर्वबाद 290 धावा बनवल्या. व ९९ धावांची पुरेशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरले. भारतर्फे उमेश यादवने सार्वधिकी ३ गाडी बाद केले.

भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सावधगिरीने सुरवात केली. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांनीं केलेल्या साधारण चेंडूंवर आर्कषक फटकेही खेळले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या १६ षटकांत ४३ धावा झाल्या असून अजून इंग्लंड संघाकडे ५६ धावांची आघाडी आहे. व भारताचे दोन्ही सलामीवीर नाबाद आहेत. त्यामुळे उद्या भारतीय फलंदाज इंग्लंड संघाला मोठे आव्हान देऊ शकतील का कि इंग्लंड संघ तिसऱ्या सामन्याप्रमाणे भारतीय फालंदाजांना रोखण्यात यशस्वी होईल हे पाहणे महत्वाचे असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com