Elon Musk Manchester United: एलन मस्कचा ट्विटर नंतर फुटबॉल क्लबवर डोळा, केली मोठी घोषणा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने फूटबॉल जगताबद्दल एक मोठी घोषणा केली आहे.
Elon Musk Manchester United
Elon Musk Manchester UnitedDainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk Manchester United: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी क्रीडा जगताबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी इंग्लिश फुटबॉल क्लब विकत घेण्याचे ठरवले आहे. याची घोषणाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. एलन मस्क यांनी सोशल मीडियावर काही राजकीय ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये घोषित केले की ते इंग्लंडचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेत आहे. पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोही याच क्लबकडून खेळतो.

एलोन मस्क ट्विट करून घोषणा केली असली तरी, क्लबच्या खरेदीबाबत मस्कने कोणतीही तपशीलवार माहिती दिली नाही. मस्क यांनी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले की, 'मी हे स्पष्ट करतो की मी रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाला समान पाठिंबा देतो.' यानंतर, मस्कने आणखी एख ट्विट केले ज्यात त्यांनी, 'मी देखील मँचेस्टर युनायटेड खरेदी करणार आहे. तुमचे स्वागत आहे.' असे लिहिले आहे. मस्कच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

Elon Musk Manchester United
Elon Musk Goes Shirtless: इलॉन मस्क यांचा शर्टलेस लूक पाहिलात का?

फुटबॉल क्लबच्या मालकाचे काय मत आहे

एलन मस्क हे वादग्रस्त आणि ट्रेंडमध्ये राहण्यासाठी ट्विट करण्यासाठी ओळखले जातात. यावेळीही त्यांनी असे काही ट्विट केले, जे ट्रेंडमध्ये आले. मस्कने आपल्या ट्विटमध्ये मँचेस्टर युनायटेडला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव खरेदी करत असल्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र ट्विट करून ट्रेंडमध्ये येण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सध्या अमेरिकन ग्लेझर कुटुंबाच्या ताब्यात आहे. मस्कच्या या ट्विटनंतर ग्लेसर कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याचवेळी, या एका ट्विटनंतर मस्कने याबाबत कोणतेही विधान किंवा ट्विट केलेले नाही. त्यामुळे हे विधान ते खरं करून दाखवणार की फक्त ट्रेंड म्हणून राहणार हे तर येणाऱ्या वेळेतच बघावे लागेल.

Elon Musk Manchester United
Elon Musk: इलॉन मस्क यांचा ट्विटरवर फसवणुकीचा आरोप, प्रकरण कोर्टात दाखल

दरम्यान, टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांनी तीन महिन्यांपूर्वी मायक्रो-ब्लॉगिंग कंपनी ट्विटर (Twitter) विकत घेतले. पण, त्यानंतर झालेल्या वादात मस्क यांनी ही डिल रद्द करत ट्विटर खरेदी करण्यास नकार दिला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले असून, एलन मस्क यांनी ट्विटरवर फसवणुकीचा (Cheating) आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com