भारताच्या इलावेनिल वलारिवनचा रिओमध्ये सुवर्णवेध, ISSF World Cup मध्ये जिंकले दुसरे गोल्ड मेडल

Elavenil Valarivan: रिओ शुटींग वर्ल्डकपमध्ये भारताच्या इलावेनिल वलारिवनने सुवर्णपदक जिंकले आहे.
Elavenil Valarivan
Elavenil ValarivanDainik Gomantak

Elavenil Valarivan won gold Medal in women's 10m air rifle event at ISSF World Cup in Rio de Janeiro:

इंटरनॅशनल शुटिंग फेडरेशनच्या (ISSF) रायफल आणि पिस्तुल वर्ल्डकप स्पर्धेत रिओ द जेनेरियो यथे भारताच्या इलावेनिल वालारिवान हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तिचे या स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक आहे.

इलावेनिल हिने 8 स्पर्धकांमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत शानदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने तिच्या 24 शॉट्समध्ये एकदाही 10.1 पेक्षा कमी पॉइंट्स मिळवले नाही. तिने अंतिम फेरीत 252.2 पॉइंट्स मिळवले.

Elavenil Valarivan
Asia Cup फायनलवरही पावसाचे सावट, भारत वि. श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार विजेतेपद?

अंतिम फेरीत तिला फ्रान्सच्या 20 वर्षीय ओशियन म्युलरने चांगली लढत दिली होती. पण, मुलेर दुसऱ्या क्रमांकावर राहिली. तिने 251.9 पॉइंट्ससह रौप्य पदकाला गवसणी घातली. चीनच्या झँग जिआलेने कांस्य पदकाला गवसणी घातली.

क्वालिफिकेशनमध्ये इलावेनिलने 630.5 पॉइंट्सह आठव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. क्वालिफिकेशनमध्ये म्युलर 633.7 पॉइंट्ससह अव्वल क्रमांकावर राहिली होती.

याच स्पर्धेच पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात भारताचा संदीप सिंग सहभागी झाला होता. तो क्वालिफिकेशनमध्ये 628.2 शॉट्ससह 14 व्या क्रमांकावर राहिला.

Elavenil Valarivan
ISSF World Championships: भारतीय नेमबाजांचा अचूक लक्ष्यभेद! अखिल, मेहुलीने पदकांसह मिळवलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट

त्याचबरोबर शुक्रवारी संदीप आणि इलावेनिल यांची जोडी 10 मीटर एयर रायफल मिश्र संघ प्रकारात 629.1 पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर राहिली होती.

या प्रकारात चौथे स्थान इस्त्राइलला मिळाले होते, ज्यामुळे त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. संदीप आणि इलावेनिल यांच्या जोडीचे हे स्थान केवळ 0.5 पॉइंट्सने हुकले. इस्त्राइलने कांस्य पदकाला गवसणी घातली. तसेच जर्मनीने सुवर्ण पदक जिंकले, तर हंगेरीने रौप्य पदक जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com