मीराबाई चानूच्या चंदेरी कामगिरीबद्दल, डॉमिनोजच मोठं गिफ्ट

पिझ्झा जायंट डॉमिनोज इंडिया यांनी याचाच एक भाग म्हणून मिराबाई चानू(Mirabai Chanu) यांना आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देणार असल्याची घोषणा केली आहे.
Domino's India Offers Free Pizza for lifetime to Mirabai Chanu
Domino's India Offers Free Pizza for lifetime to Mirabai Chanu Dainik Gomantak
Published on
Updated on

सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये(Tokyo Olympics) भारताची सुरुवात गोड झाली कारण वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) रौप्य पदकासह(Silver) देशाला यावर्षीचे पहिले पद मिळवून दिले. चानूने 49 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करीत देशाचे पदकांचे खाते उघडले. शनिवारी मीराबाई चानूने पहिल्या प्रयत्नात 110 किलो वजन उचलले. दुसर्‍या प्रयत्नात मीराबाई चानू 115 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरल्या. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कित्येक वर्षे सुरू असलेल्या प्रशिक्षण आणि तिची अपार मेहनतिचा परिणाम म्हणून काल तिचा विजय झाला. तिच्या या कामगीरीने शनिवारी समस्त भारतीयांना आंनद दिला. तिच्या विजयाची बातमी येताच सर्वत्र जल्लोष सुरु झाला होता, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही मीराबाईला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकजण या आनंदाच्या बातमीमध्ये आपल्यापरीने आनंद व्यक्त करताना दिसत आहे. आणि आता याच आनंदात डॉमिनोज इंडिया देखील आपल्या परीने आनंद व्यक्त करताना दिसत आहे करत पिझ्झा जायंट डॉमिनोज इंडिया(Dominos India) यांनी याचाच एक भाग म्हणून मिराबाई चानू यांना आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देणार असल्याची घोषणा केली आहे. (Dominos Pizza)

काही दिवसांपूर्वी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मिराबाई चानू यांनी एका मुलाखती दरम्यान तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे असं सांगितल होत. आता तिची हीच इच्छा पूर्ण करत बहुराष्ट्रीय पिझ्झा जायंट डॉमिनोजने मिराबाई यांना आयुष्यभर नि: शुल्क पिझ्झा देण्याची घोषणा करत पूर्ण केली आहे. डॉमिनोज इंडियाने घेतलेल्या या निर्णयाच सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com