Deodhar Trophy 2023: देवधर ट्रॉफीमध्ये रियानचं तूफानी 'शतक', गोलंदाजांना दाखवलं आस्मान

Deodhar Trophy 2023: देवधर ट्रॉफीमध्ये रियान परागची बॅट तळपली. आसामच्या या युवा फलंदाजाने मोसमातील दुसरे शतक झळकावले आहे.
Riyan Parag
Riyan ParagDainik Gomantak
Published on
Updated on

Deodhar Trophy 2023: देवधर ट्रॉफीमध्ये रियान परागची बॅट तळपली. आसामच्या या युवा फलंदाजाने मोसमातील दुसरे शतक झळकावले आहे.

पूर्व विभागाकडून खेळत असलेल्या रियान परागने पश्चिम विभागाविरुद्ध 66 चेंडूत शानदार शतक झळकावले.

सहाव्या क्रमांकावर शतक ठोकले

दरम्यान, रियान पराग सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आणि त्याने शानदार फलंदाजी करत 68 चेंडूत 102 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 शानदार चौकार आणि 5 जबरदस्त षटकार मारले.

कुशाग्रासोबत त्याने सहाव्या विकेटसाठी 106 चेंडूत 150 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पूर्व विभागाची धावसंख्या 319 धावांवर पोहोचली.

Riyan Parag
Deodhar Trophy 2023: रियान परागचा जलवा! 11 षटकारांसह शतक करत मोडला 13 वर्षे जूना रेकॉर्ड

उत्तर विभागाविरुद्धही शतक ठोकले

याआधी, रियान परागनेही उत्तर विभागाविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. परागने 102 चेंडूत 131 धावांची जबरदस्त खेळी केली.

ज्यामध्ये त्याने 11 जबरदस्त षटकार आणि 5 शानदार चौकार मारले. परागचे हे मोसमातील पहिले शतक ठरले.

Riyan Parag
Deodhar Trophy 2023: अर्जुन तेंडुलकर, मोहित रेडकर या गोव्याच्या खेळाडुंची दक्षिण विभाग संघात निवड

लिस्ट-ए मध्ये पाचवे शतक

देशांतर्गत हंगामात आसामच्या (Assam) या युवा फलंदाजाने शानदार प्रदर्शन केले. त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत आतापर्यंत पाच शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये 174 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

याशिवाय, परागने पाच अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने 41 डावांमध्ये 38 पेक्षा जास्त सरासरीने 1500 धावांचा टप्पा ओलांडला आहे, त्यात त्याच्या 48 विकेट्सचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com