Deodhar Trophy 2023: रियान परागचा जलवा! 11 षटकारांसह शतक करत मोडला 13 वर्षे जूना रेकॉर्ड

Riyan Parag: देवधर ट्रॉफीमध्ये खेळताना रियान परागने 11 सिक्ससह शतकी खेळी केली आहे. तसेच मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Riyan Parag
Riyan ParagDainik Gomantak
Published on
Updated on

Deodhar Trophy 2023 Riyan Parag slam century with 11 sixes: भारतात सध्या देवधर ट्रॉफी ही देशांतर्गत लिस्ट ए क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान, याच स्पर्धेत शुक्रवारी रियान परागने अष्टपैलू कामगिरीने सर्वांना चकीत केले.

आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना फारशी चांगली कामगिरी न करू शकलेला पराग देवधर ट्रॉफीमध्ये मात्र चमकला आहे. त्याने शुक्रवारी पूर्व विभागाकडून खेळताना उत्तर विभागाविरुद्ध तुफानी शतक केले. या शतकी खेळी दरम्यान त्याने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.

Riyan Parag
Deodhar Trophy 2023 : ‘देवधर’ मैदानावर दीर्घ कालावधीनंतर गोव्याचा खेळाडू; अर्जुन तेंडुलकरला संधी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पूर्व विभागाकडून रियान सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्यावेळी त्याने कुमार कुशाग्रसह 6 व्या विकेटसाठी 235 धावांची मोठी भागीदारी रचली. त्याचबरोबर त्याचे शतकही केले.

त्यांच्या भागीदारीमुळे पूर्व विभागाने 50 षटकात 8 बाद 337 धावा केल्या. रियानने 102 चेंडूत 5 चौकार आणि 11 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. तसेच कुशाग्रने 87 चेंडूत 98 धावा केल्या.

दरम्यान, परागने 11 षटकार मारल्याने तो देवधर ट्रॉफी स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने युसूफ पठाणचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. युसूफने 2010 साली पश्चिम विभागाकडून खेळताना उत्तर विभागाविरुद्ध 9 षटकार मारले होते.

Riyan Parag
Duleep Trophy: विहारीच्या साऊथ झोनने उंचावली ट्रॉफी, रोमांचक फायनलमध्ये वेस्ट झोनचा पराभव

गोलंदाजीतही कमाल

परागने केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजी करताना 10 षटकात 57 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे उत्तर विभागाला 45.3 षटकात 249 धावांवरच बाद करण्यात पूर्व विभागाला यश मिळाले.

दरम्यान पूर्व विभागाकडून परागव्यतिरिक्त शाहबाज अहमदने 3 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश दीप, मुख्तर हुसेन आणि उत्कर्ष सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

उत्तर विभागाकडून मनदीप सिंगने 50 धावांची खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने 44 धावांची, शुभम रोहिलाने 41 धावांची आणि हिमांशू राणाने 40 धावांची खेळी केली. पण यांच्यातील कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे उत्तर विभागाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com