Sushil Kumar
Sushil KumarDainik Gomantak

Sagar Dhankar Murder Case: बुडत्याचा पाय खोलात! कुस्तीपटू सुशील कुमारच्या वाढल्या अडचणी

Sushil Kumar: कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ऑलिम्पियन सुशील कुमार आणि इतर 17 जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
Published on

Olympian Sushil Kumar: कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ऑलिम्पियन सुशील कुमार आणि इतर 17 जणांवर आरोप निश्चित केले आहेत. कुस्तीपटू सुशील कुमार आणि अन्य 17 आरोपींविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हेगारी कट रचण्याचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. न्यायालयाने दोन फरार आरोपींवरही आरोप निश्चित केले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुमारे तीन आठवडे फरार राहिल्यानंतर, सुशील कुमारला 23 वर्षीय कुस्तीपटूच्या मृत्यूप्रकरणी सहआरोपी अजयसह दिल्लीच्या (Delhi) मुंडका परिसरातून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी 4 मे रोजी राष्ट्रीय राजधानीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सहकारी कुस्तीपटू सागर धनखर (Sagar Dhankhar) (23) आणि त्याच्या दोन मित्रांवर हल्ला केला होता. यामध्ये सागर याचा मृत्यू झाला होता.

Sushil Kumar
Sagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसांकडून 'चितपट'

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आपल्या अहवालात म्हटले आहे की, आरोपी हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड असून त्याने इतर सहआरोपींसोबत हरियाणा आणि दिल्लीतील गुन्हेगारांसह शस्त्रांची व्यवस्था करण्याचा कट रचला होता. तर गेल्या वर्षी 18 मे रोजी सुशील कुमारने अटक टाळण्यासाठी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी एकतर्फी कारवाई केली जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र न्यायालयाने सुशील कुमारची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाने सुशील कुमारला 'कटकारस्थान करणारा', असे संबोधले होते. तसेच, त्याच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले होते.

तसेच, दिल्ली पोलिसांनी या वर्षी मार्चमध्ये सुशील कुमारच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी चॅम्पियन कुस्तीपटूला इतके घाबरले होते की, त्यांनी संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली, असे पोलिसांनी सांगितले होते.

Sushil Kumar
Sidhu Moose Wala Murder Case: लॉरेन्स टोळीचा गँगस्टर दीपक टिनू पोलिसांच्या ताब्यातून फरार...

शिवाय, सुशील कुमारने (Sushil Kumar) आपल्या अर्जात म्हटले की, 'पोलिसांनी माझी खोटी आणि दोषी प्रतिमा तयार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी मीडियाला चुकीची माहितीही दिली.' सुशील कुमारने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com