रोशनचा गोल बंगळूरसाठी निर्णायक

पराभवामुळे केरळा ब्लास्टर्सच्या अव्वल स्थानाच्या प्रयत्नास धक्का
युवा बचावपटू रोशनसिंग नाओरेम
युवा बचावपटू रोशनसिंग नाओरेम Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: युवा बचावपटू रोशनसिंग नाओरेम आठव्या इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेत बंगळूर एफसीसाठी खूपच प्रभावी ठरला आहे. रविवारी त्याने नोंदविलेल्या डाव्या पायाच्या सणसणीत थेट फ्रिकिकवर माजी विजेत्यांना विजय मिळविता आला, तर केरळा ब्लास्टर्सच्या अव्वल स्थान पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नास जबर धक्का बसला.

वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर रोशन याने 56व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे बंगळूर एफसीने सामना 1-0 फरकाने जिंकला. त्यामुळे ते सलग आठव्या सामन्यात अपराजित राहिले. या कालावधीत त्यांनी चार विजय आणि तेवढ्याच बरोबरी नोंदविल्या आहेत. कोविड-19 विलगीकरण संपवून मैदानात उतरलेल्या केरळा ब्लास्टर्सची 10 सामन्यांची अपराजित मालिका खंडित झाली, तसेच अव्वल स्थानावरील हैदराबाद एफसीला गाठता आले नाही.

युवा बचावपटू रोशनसिंग नाओरेम
T20 Series: ना ख्रिस ना लुईस, आता फक्त रोव्हमन पॉवेल

रोशनने रविवारच्या सामन्यापूर्वी महत्त्वपूर्ण योगदान देताना पाच असिस्टची नोंद केली होती. या बावीस वर्षीय खेळाडूच्या डाव्या पायाच्या झणझणीत फ्रीकिकसमोर केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन सिंग निरुत्तर ठरला. आयएसएलमधील दुसरा मोसम खेळणाऱ्या रोशनचा हा पहिलाच गोल ठरला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

बंगळूरची प्रगती

केरळा ब्लास्टर्सला हरविल्यामुळे मार्को पेझ्झाईयोली यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरने गुणतक्त्यात प्रगती साधली आहे. 14 सामन्यांतील त्यांचा हा पाचवा विजय असून 20 गुणांसह त्यांनी केरळा ब्लास्टर्सला गाठले आहे. गुणतक्त्यात हैदराबाद एफसी 23 गुणांसह पहिल्या, तर जमशेदपूर एफसी 22 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळा ब्लास्टर्सला स्पर्धेत अवघा दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 12 लढतीनंतर ते तिसऱ्या स्थानी राहिले. समान गुण झाल्यानंतर केरळा ब्लास्टर्सने (+7) बंगळूर एफसीला (+5) चौथ्या स्थानी ठेवले. बंगळूर व केरळा ब्लास्टर्स यांच्यात पहिल्या टप्प्यात झालेला सामना 1-1 गोलबरोबरीत राहिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com