आज दिल्ली आणि राजस्थानमध्ये होणार सामना, या खेळाडूंमध्ये रोमांचक लढत

या दोन खेळाडूंमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार
dc vs rr ipl 2022 these players battle to watch out in match between delhi capitals and rajasthan royals rishabh pant sanju samson
dc vs rr ipl 2022 these players battle to watch out in match between delhi capitals and rajasthan royals rishabh pant sanju samsonDainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध होईल. या स्पर्धेत दोन्ही संघांनी धमाका केला आणि मधेच अडखळले. मात्र अखेरच्या सामन्यात पुन्हा एकदा दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. आजच्या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये परस्पर युद्ध रंगणार आहे. यांवर एक नजर टाकूया. (DC vs RR ipl 2022)

डेव्हिड वॉर्नर विरुद्ध ट्रेंट बोल्ट

दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर उत्कृष्ट लयीत दिसत असून तो सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या सामन्यात वॉर्नरला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आतापर्यंत वॉर्नर आणि ट्रेंट बोल्ट 4 सामन्यात आमनेसामने आले आहेत, ज्यात त्यांनी फक्त 23 धावा केल्या आहेत.

dc vs rr ipl 2022 these players battle to watch out in match between delhi capitals and rajasthan royals rishabh pant sanju samson
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी आणि कुठे?

कुलदीप यादव विरुद्ध संजू सॅमसन

दिल्लीचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव या मोसमात आतापर्यंत सातत्याने महत्त्वाच्या विकेट घेत आहे. त्याने यापूर्वी 13 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र संजू सॅमसनला रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. संजू सॅमसनने आतापर्यंत सहा सामन्यांत 25.83 च्या सरासरीने आणि 158.16 च्या स्ट्राईक रेटने 155 धावा केल्या आहेत. या दोन खेळाडूंमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

जोस बटलर विरुद्ध खलील अहमद

कुलदीप यादव (13) नंतर वेगवान गोलंदाज खलील अहमद दिल्लीचा सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. खलीलने आतापर्यंत 10 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यासमोर मोसमातील सर्वात स्फोटक फलंदाज जोश बटलर असेल, ज्याने या मोसमात आतापर्यंत दोन शतकांसह सर्वाधिक धावा केल्या आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com