RCB ने चूक केली का? ट्रेड केलेल्या अष्टपैलूने शतक झळकावत दिले उत्तर, पाहा व्हिडिओ

Shahbaz Ahmed: शाहबाजच्या शतकी खेळीनंतर हैदराबाद संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल, पण त्याच्या नव्या संघासाठी तो पुढील हंगामात आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 Shahbaz Ahmed|RCB|SRH
Shahbaz Ahmed|RCB|SRHDainik Gomantak
Published on
Updated on

Days after RCB traded Shahbaz Ahmed to Sunrisers Hyderabad, he has scored a brilliant century in the Vijay Hazare Trophy:

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जातील, तर भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. म्हणजे जवळपास सर्वच भारतीय खेळाडू यावेळी अॅक्शनमध्ये आहेत.

दरम्यान, आयपीएल 2024 साठी लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे, ज्यासाठी संघ त्यांच्या तयारीत व्यस्त आहेत.

आयपीएलमध्ये, त्यांच्या खेळाडूंना करारमुक्त करणे आणि कायम ठेवण्याव्यतिरिक्त, संघ ट्रेड देखील करताहेत.

आरसीबीने त्यांचा खेळाडू शाहबाज अहमदचा सनरायझर्स हैद्राबाशी ट्रेड केल्यानंतर काही दिवसांतच, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार शतक झळकावले आहे.

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये शाहबाज अहमद बंगालकडून खेळत आहे. आज बंगाल आणि हरियाणा यांच्यात सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये शाहबाजने दमदार शतक झळकावले. तो एकमेव खेळाडू होता ज्याने हरियाणाच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला, इतर कोणत्याही फलंदाजाला जास्त धावा करता आल्या नाहीत.

बंगालकडून अभिषेक पोरल आणि रणज्योत सिंग सलामीला आले. रणज्योत सिंग सहा धावा करून बाद झाला. यानंतर अभिषेक पोरललाही केवळ २४ धावा करता आल्या. सुदीप कुमारने २१ धावा केल्या. तर मजुमदारने १४ धावांची खेळी केली.

 Shahbaz Ahmed|RCB|SRH
भारताला WC जिंकून देणाऱ्या गोलंदाजापासून ते 6 षट्कार खाणाऱ्या गोलंदाजापर्यंत या दिग्गजांनी यंदा घेतली निवृत्ती

पण शाहबाज अहमद एका बाजूल पाावा य रोवून उभा राहिला. दुसऱ्या टोकाच्या एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. अशा परिस्थितीत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. परिस्थिती अशी होती की एकीकडे शाहबाजने शतक ठोकले तर दुसऱ्या बाजूला एकाही फलंदाजांला समाधानकार धावा करता आल्या नाहीत.

या सामन्यात शाहबाजने 118 चेंडूंचा सामना करत 100 धावांची खेळी खेळली. अखेरच्या षटकात तो बाद झाला. बंगालने निर्धारित 50 षटकात 255 धावा केल्या आहेत.

 Shahbaz Ahmed|RCB|SRH
Birthday Special: भारताचे पहिले ग्रँडमास्टर ते वर्ल्ड चॅम्पियन, विश्वनाथन आनंदबद्दलचे खास फॅक्ट्स

शाहबाज अहमद याआधी आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळला आहे. 2022 च्या लिलावात त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली. पण आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढत बराच काळ चालली, पण शेवटी आरसीबीने त्याला सर्वाधिक किंमत देऊन आपल्या संघात समाविष्ट केले.

तथापि, यानंतर, आरसीबीने त्याला नवीन हंगामापूर्वी सनरायझर्सशी ट्रेड केले आहे. एसआरएचचा मयंक डागर आता आरसीबीमध्ये आला आहे आणि शाहबाज अहमद सनरायझर्स हैदराबादमध्ये गेला आहे. त्याच्या शतकी खेळीनंतर हैदराबाद संघाने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल, पण त्याच्या नव्या संघासाठी तो पुढील हंगामात आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com