Dale Steynची सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती; सोशल मिडियावर व्यक्त केल्या भावना

Dale Steyn ने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये कसोटी पदार्पण केले होते.
Dale Steyn
Dale SteynDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) आता छोट्या फॉरमॅटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. स्टेनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. स्टेनने आधीच कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेत असल्याचे जाहीर केले. आता दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाने वनडे आणि टी -20 मधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 265 सामन्यांमध्ये 23.37 च्या सरासरीने 699 आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत, तर 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी घेतले आहेत. 125 एकदिवसीय सामन्यात 196 बळी घेतले आहेत त्याचबरोबर 47 टी-20 सामन्यात 64 बळी घेतले आहेत.

स्टेनने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर 2005 मध्ये आफ्रिका इलेव्हनविरुद्ध एक सामना खेळून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्टेनने 2007 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळून टी -20 मध्ये पदार्पण केले.

Dale Steyn
IPLमध्ये दोन नवीन संघांच्या येण्याने BCCI होऊ शकतो मोठा फायदा

चाहत्यांमध्ये 'स्टेन गन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. स्टेन दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आपल्या सेवानिवृत्तीच्या पोस्टमध्ये स्टेनने चाहत्यांनी केलेल्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानले.

स्टेनने आपल्या पत्रात लिहिले की, '20 वर्षांचे प्रशिक्षण, सामने, प्रवास, विजय, पराजय, बंधुत्व, आनंद. सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत. आभार मानायला अनेक जण आहेत. आज मी ज्या खेळातून मला सर्वात जास्त आवडतो त्यापासून अधिकृतपणे निवृत्ती घेतो आहे. स्टेनच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेत वेगवान गोलंदाजीचे एक महान पर्व संपले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com