CWG 2022: वेटलिफ्टर्स विकास ठाकूरची उत्कृष्ट कामगिरी, 96 किलो गटात जिंकले रौप्य पदक

2014 च्या ग्लासगो गेम्समध्येही त्याने दुसरे स्थान पटकावले होते तर 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे ठाकूरने कांस्यपदक जिंकले होते.
 Vikas Thakur CWG 2022
Vikas Thakur CWG 2022Twitter
Published on
Updated on

CWG 2022: भारताचा हेवीवेट लिफ्टर विकास ठाकूर (Vikas Thakur) याने मंगळवारी 96 किलो वजनी गटात रौप्यपदकासह आणखी एक राष्ट्रकुल क्रीडा पदक जिंकले. अनुभवी ठाकूरने एकूण 346 किलो (155 किलो आणि 191 किलो) वजन उचलून दुसऱ्या स्थानावर राहून सलग तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेतील ठाकूरचे हे दुसरे रौप्यपदक आहे. 2014 च्या ग्लासगो गेम्समध्येही त्याने दुसरे स्थान पटकावले होते तर 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे त्याने कांस्यपदक जिंकले होते.

 Vikas Thakur CWG 2022
CWG मध्ये भीषण अपघात! भारतीय सायकलपटू विश्वजीत थोडक्यात बचावला, VIDEO

समोआच्या डॉन ओपेलोगेने एकूण 381 किलो (171 किलो आणि 210 किलो) वजन उचलून रेकॉर्डब्रेक कामगिरीसह सुवर्णपदक पटकावले आणि 2018 च्या कामगिरीत सुधारणा करत त्याने रौप्यपदक जिंकले. फिजीच्या टेनिएला तुईसुवा रेनिबोगीने एकूण 343 किलो (155 किलो आणि 188 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. पाच वेळा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप पदक विजेत्या ठाकूरने स्नॅचमध्ये तीन प्रयत्नांत 149 किलो, 153 किलो आणि 155 किलो वजन उचलून या प्रकारात संयुक्त तिसरे स्थान पटकावले.

 Vikas Thakur CWG 2022
CWG2022: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, लॉन बाउल्समध्ये सुवर्णपदक

ठाकूरने क्लीन अँड जर्कमध्ये 187 किलो वजन उचलून सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात 191 किलो वजन उचलण्यासाठी त्याला थोडीशी धडपड करावी लागली पण पंजाबचा लिफ्टर या प्रयत्नात यशस्वी ठरला आणि भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने मांडी थोपटून आनंद साजरा केला. रौप्य पदकाची खात्री झाल्यानंतर, ठाकूरने शेवटच्या प्रयत्नात 198 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, जो त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा एक किलो जास्त होता. मात्र, हे वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. पण ही स्पर्धा स्नॅच, क्लीन आणि जर्क आणि एकूण वजन या तिन्ही प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम करणाऱ्या ओपेलोजच्या नावावर होती. स्थानिक स्पर्धक सिरिल टेचेट क्लीन अँड जर्कमध्ये वैध प्रयत्न करू न शकल्याने निराश झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com