धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी रेल्वे स्टेशनवरच घालवली रात्र! पावसामुळे रखडलेल्या IPL Final वेळचे Video व्हायरल

IPL 2023 फायनल राखीव दिवशी खेळवण्यात येणार असल्याने चाहत्यांनी रेल्वे स्टेशनवरच रात्र घालवण्याचा निर्णय घेतला.
Fans
Fans Dainik Gomantak
Published on
Updated on

CSK and cricket fans sleeping at the railway station: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. पण रविवारी अहदाबादमध्ये मुसळधार पाऊस असल्याने हा सामना राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी हलवण्यात आला. 

त्यामुळे रविवारी अंतिम सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना मात्र माघारी जावे लागले. पण जवळपास रात्री 11 वाजता सामना राखीव दिवशी सामना होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काही चाहत्यांनी तेथीलच जवळच्या रेल्वे स्टेशनवर रात्र घालवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे अनेक चाहते अंतिम सामना राखीव दिवशी हलवल्यानंतर रविवारी रेल्वे स्टेशनवर झोपले असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. यातील अनेक चाहते चेन्नईची जर्सी घातलेले दिसत आहेत.

Fans
IPL 2023: आयपीएल फायनलमध्ये हार्दिक करणार मोठा रेकॉर्ड नावावर, धोनीची इच्छा असूनही...!

दरम्यान, रविवारी अहमदाबादला जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यावरही बरेच पाणी साचले होते. त्यामुळे चाहत्यांना माघारी परततानाही बरेच कष्ट घ्यावे लागले. पावसामुळे अनेक चाहत्यांचे हालही झाले. त्याचेही व्हिडिओ व्हायरल झाले.

राखीव दिवशी होणार अंतिम सामना

आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा अंतिम सामना आता रविवारऐवजी सोमवारी खेळवला जाणार आहे. रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत सामना पाऊस थांबण्याची वाट पाहाण्यात आली. पण पाऊसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच मैदानही ओले झाल्याने सामनाधिकाऱ्यांनी हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी घेण्याचा निर्णय घेतला.

आता सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून त्यापूर्वी नाणेफेक घेतली जाईल.

Fans
MS Dhoni Last Match: धोनीबाबत 2019 वर्ल्डकपचीच IPL मध्येही होणार पुनरावृत्ती? त्या घटनेने फॅन्स इमोशनल

पहिल्यांदाच झाले असे

आयपीलएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की अंतिम सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये कोणताही सामना राखीव दिवशी झाला नव्हता.

तिकिट्स असणाऱ्या चाहत्यांना मिळणार प्रवेश

रविवारी सामना रद्द झाला असला आणि सोमवारी सामना होणार असला, तरी या सामन्यासाठी तिकिट्स घेतलेल्या चाहत्यांची निराशा होणार नाही. कारण बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे की चाहत्यांनी या सामन्यासाठी घेतलेली प्रिंटेड तिकिट्स जपून ठेवा. कारण याच तिकिट्सनुसार चाहत्यांना राखीव दिवशी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com