Glenn Maxwell
Glenn MaxwellDainik Gomantak

क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल झाला भारताचा जावई

आयपीएल (IPL) संघ चेन्नई सुपर किंग्सने (CSK) देखील मॅक्सवेलचे अभिनंदन केले आहे.
Published on

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमनशी रविवारी तमिळ पद्धतीने लग्न केले. मॅक्सवेल 2017 पासून विनीला डेट करत होता. मेलबर्नमध्ये राहणारी विनी रमन ही व्यवसायाने फार्मासिस्ट असून ती तामिळ कुटुंबातील आहे. त्यामुळेच तामिळ पद्धतीने हे लग्न पार पडले. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाचे तामिळ भाषेतील व्हिजिटिंग कार्डही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Glenn Maxwell
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या विजयानंतर मोठा झटका, मिचेल मार्श दुखापतग्रस्त

आयपीएल (IPL) संघ चेन्नई सुपर किंग्सने (CSK) देखील मॅक्सवेलचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर मॅक्सवेल आणि विनीचा फोटो शेअर करत चेन्नई फ्रँचायझीने लिहिले - मॅक्सवेल चेन्नईचा जावई झाला आहे.

Glenn Maxwell
VIDEO: अंधमुलीने बास्केटबॉल नेटमध्ये टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले

लग्नामुळे पहिला सामना खेळू न शकलेला मॅक्सवेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) क्रिकेट खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने त्याला चालू हंगामात 11 कोटी देऊन 'रिटेन' केले आहे. आरसीबीने रविवारी पंजाब विरुद्ध पहिला सामना खेळला.

लग्नामुळे मॅक्सवेल हा सामना खेळू शकला नाही. तो पुढील सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. RCB चा दुसरा सामना 30 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. लग्नामुळे मॅक्सवेलने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com