कोहलीचे 'विराट' पुनरागमन फिके..! लाजिरवाने रेकॉर्ड

विराट कोहली कसोटी कारकिर्दीत 14व्यांदा शून्यावर आऊट झाला आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत त्याला एकही रण न करता आपल्या तंबूत परतण्याची त्याची ही पहिलीच वेळ..
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Cricket : कसोटी सामन्यात (Test cricket) शून्यावर बाद झाल्यानंतर विराटच्या (Virat Kohli) नावावर अनेक खराब रेकॉर्ड जमा झाले आहेत. आता विराट सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यात बाद होणारा भारतीय कर्णधार (Captain) बनला आहे. विराट सहाव्यांदा कसोटी सामन्यात मैदानावर एकही धाव न करता बाद झाला आहे. यादरम्यान त्याने 5 वेळा शून्यावर बाद झालेल्या मन्सूर अली खान पतौडीचा रेकॉर्ड (Records) मोडला. या यादीत महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Virat Kohli
Systematic investment plan: 7,000 रुपयांच्या SIP मधून मिळवा 8 लाख रुपये पेन्शन

दोन्ही खेळाडू कसोटी सामन्यात 3 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये, कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथची बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहली 10 व्यांदा शून्यावर बाद झाला, हा भारतीय खेळाडूचा पहिला विक्रम आहे. कसोटीत कर्णधार म्हणून शून्यावर बाद होण्याच्या यादीत स्टीफन फ्लेमिंग पहिल्या क्रमांकावर आहे, जो 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Virat Kohli
सलग पराभवामुळे एफसी गोवा चिंतित; नॉर्थईस्टविरुद्ध विजयासाठी प्रयत्न

तसेच माइक अथर्टन, हॅन्सी क्रोनिए आणि एमएस धोनी कर्णधार म्हणून कसोटीत आठ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. विराट कोहली कसोटी कारकिर्दीत 14व्यांदा शून्यावर आऊट झाला आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत त्याला एकही रण न करता आपल्या तंबूत परतण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. विराटशिवाय चेतेश्वर पुजारालाही पहिल्या सामन्यात एकही रण न करता आपल्या तंबूत परतावे लागले होते. एजाज पटेलनेही पुजाराची विकेट काढली होती. पुजारा कसोटीत दहाव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. पण विराट कोहलीप्रमाणे त्यालाही न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा एकही रण न करता परतावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com