आयपीएल 2022 मध्ये पहिले 8 सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने दोन सामने जिंकले पण आता या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा सामना विजेता फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. या उजव्या हाताच्या स्टार फलंदाजाच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो मुंबईचे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादवच्या हाताला मार लागला आहे, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या दुखापतीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. मुंबई इंडियन्सने निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताला मार लागला आहे. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.''
सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे पहिले दोन सामनेही खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा फटका बसला होता. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2022 मध्ये पाऊल ठेवताच चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटने 8 सामन्यात 43 पेक्षा जास्त सरासरीने 303 धावा केल्या, त्यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादवला दुखापतीनंतर विश्रांती देण्यात आली आहे कारण आयपीएलनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत अनेक मोठ्या नावांना विश्रांती दिली जाऊ शकते, त्यामुळे सूर्यकुमारची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.