विराट कोहलीची जसप्रीत बुमराहबद्दलची 'ती' प्रतिक्रिया आली समोर

2014 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 'तो' होता आरसीबीचा खेळाडू
cricket news parthiv patel reveals virat kohli said to bumrah bumrah kya karega
cricket news parthiv patel reveals virat kohli said to bumrah bumrah kya karega Dainik Gomantak

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह हा केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील सर्वात मजबूत गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवास केला आहे. IPL 15 सुरु झाले आहे आणि याच दरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना मोठा खुलासा केला आहे.

पार्थिव पटेलने बोलताना सांगितले की 2014 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तो आरसीबीचा (RCB) खेळाडू होता. त्यादरम्यान त्याने बुमराहबद्दल विराटशी संवाद साधला, मात्र कोहलीने पार्थिवच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आणि म्हणाला होता की बुमराह-वुमराह काय करणार?

cricket news parthiv patel reveals virat kohli said to bumrah bumrah kya karega
RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँकेत 'या' पदांसाठी निघाली भरती

पार्थिव पटेल क्रिकबझशी बोलताना म्हणाला, 'मी 2014 साली आरसीबीचा भाग होतो. मी विराट कोहलीला बुमराहचे नाव सांगितले आणि त्यावर लक्ष घालण्यास सांगितले. विराटने मला उत्तर दिले, 'छोड ना यार... ये बुमराह-वुमराह क्या करेगा?'

पार्थिव पटेलच्या या खुलाशानंतर आता विराट कोहलीला (virat kohli) त्याच्या या निर्णयाचा पश्चाताप होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुमराह आज जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि तो डेथ ओव्हर्समध्ये घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बुमराहच्या कठोर परिश्रमांबरोबरच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघानेही त्याला या गोलंदाजातून सर्वोत्तम खेळी करण्यात खूप पाठिंबा दिला आहे, ज्याचे बक्षीस या फ्रेंचायझीला आयपीएल ट्रॉफीच्या रूपात मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com