Cricket Facts: क्रिकेटच्या इतिहासातील अनोखा सामना, संपूर्ण संघाला मिळाला सामनावीराचा पुरस्कार

Man Of The Match: क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो.
Team
TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Team Won Man Of The Match: क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. त्याच वेळी, संपूर्ण मालिकेत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या खेळाडूची मालिकावीर म्हणून निवड केली जाते. पण तुम्ही कधी पाहिलंय का की, एका खेळाडूला नाही तर संपूर्ण टीमला 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र सामन्यांबद्दल सांगणार आहोत.

प्रथमच या संघाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला

क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण संघाला 1996 मध्ये न्यूझीलंड संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) वेस्ट इंडिजचा 4 धावांनी पराभव केला होता. कमी धावसंख्येच्या सामन्यात 4 फलंदाजांनी धावा केल्या आणि 6 गोलंदाजांनी विकेट घेतल्या, त्यामुळे संपूर्ण संघाला हा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराला 'प्लेअर ऑफ द मॅच' देखील म्हटले जाते.

Team
IND vs SA: तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाला दे धक्का! मालिका विजयाचे भंगू शकते स्वप्न

या संघाला पहिल्यांदाच कसोटीत हा पुरस्कार मिळाला आहे

1999 साली, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा सामना वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 351 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

पाकिस्ताननेही हा पुरस्कार पटकावला

1996 साली इंग्लंड (England) आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यातही हे घडले होते. या सामन्यात पाकिस्तानने 2 विकेट्सने विजय मिळवला, सामन्यात पाकिस्तानच्या प्रत्येक फलंदाजाने धावा केल्या, तर सर्व गोलंदाजांनीही विकेट घेतल्या. उत्कृष्ट सांघिक कामगिरी पाहता पाकिस्तानच्या (Pakistan) संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

Team
IND vs SA: भारताच्या B संघानं आफ्रिकेची उडवली झोप, केशव महाराजचं मोठं वक्तव्य

सामनावीरासाठी नियम

मॅन ऑफ द मॅच चा निर्णय घेणार्‍या तज्ज्ञ समितीमध्ये सामन्याचे समालोचक, माजी क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी यांचा समावेश होतो. हे सर्व मिळून कोणता खेळाडू सामनावीर आणि मालिकावीर ठरेल ते ठरवतात. समालोचक संपूर्ण सामन्यात प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे त्यांचे मत खूप महत्त्वाचे असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com