Umesh Yadav Karun Nair County Championship 2023: भारताचे स्टार क्रिकेटपटू उमेश यादव आणि करुण नायर यांनी बुधवारी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शानदार फलंदाजी केली.
एसेक्सकडून खेळताना फॉर्ममध्ये असलेल्या उमेशने हॅम्पशायरविरुद्ध 43 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यात 3 चौकार 4 षटकारांचा समावेश होता.
तर दुसरीकडे, नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना करुण नायरने सरेविरुद्ध 238 चेंडूत नाबाद 144 धावा केल्या. यामध्ये 22 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
दरम्यान, उमेश भारताकडून (India) शेवटचा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. अंतिम फेरीत त्याची कामगिरी काही खास नव्हती. यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघातून वगळण्यात आले.
मात्र, आता उमेशने चमकदार कामगिरी केली आहे. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने चेम्सफोर्ड येथील गेल्या सामन्यात दोन डावात केवळ तीन विकेट्स घेतल्या होत्या, परंतु सध्याच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने बॅटने जोरदार फटकेबाजी केली.
स्कोअरबोर्डवर 357 धावांवर ससेक्सची सातवी विकेट पडल्यानंतर तो 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यानंतर त्याने एकच खळबळ उडवून दिली.
दुसरीकडे, उमेशच्या विस्फोटक खेळीमुळे एसेक्सने 9 गडी गमावून 447 धावांवर पहिला डाव घोषित केला. उमेशने अवघ्या 43 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 45 चेंडूत 51 धावा करुन ऑफस्पिनर फेलिक्स ऑर्गनने बाद झाला.
डिव्हिजन वन सामन्यात करुण नायर 114 धावांवर नाबाद राहिला. नायरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध (England) भारतासाठी त्रिशतक झळकावले होते. केवळ सहा कसोटी खेळल्यानंतर मार्च 2017 मध्ये तो भारताकडून शेवटचा खेळला होता. जरी तो प्रथम श्रेणीत चांगली कामगिरी करत आहे.
या काळात त्याने 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी जवळपास 50 पेक्षा जास्त आहे. त्याने गेल्या चॅम्पियनशिप सामन्यात वॉरविकशायरविरुद्ध 177 चेंडूंत 78 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.