Football: मागील आठवड्यात प्रीमियर लीगमध्ये सहभागी क्लबमधील 42 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. "लीगमध्ये सहभागी खेळाडूंची परत कोरोना (Corona) चाचणी केली जाईल," असे नियोजकांनी सांगितले.
मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) अधिकाऱ्यांनी सांगितले की, खेळाडूंच्या सकारात्मक कोविड-19 (COVID-19) चाचण्यांनंतर त्यांनी खेळाडूंचे प्रशिक्षण संकुल बंद केले आहे. युनायटेड मंगळवारी ब्रेंटफोर्ड येथे खेळणार आहे. मात्र, सामना (Match) पुढे जावा की नाही यावर चर्चा करण्यासाठी क्लबने प्रीमियर लीगच्या (Premier League) अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड क्लबने त्यांचे किती खेळाडू कोरोना बाधित आहेत, या बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. "कोरोना बाधित खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवले आहे," क्लबने एका निवेदनात म्हटले आहे.
अॅस्टन व्हिलाचे व्यवस्थापक स्टीव्हन जेरार्ड आणि ब्राइटन अँड होव्ह अल्बियनचे प्रशिक्षक ग्रॅहम पॉटर यांनीही त्यांचे खेळाडू संक्रमित असल्याचे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.