CWG 2022: तेजस्वीन शंकरने रचला इतिहास , उंच उडीत देशासाठी जिंकले पहिले पदक

Commonwealth Games 2022: वेटलिफ्टिंग, ज्युदो, टेबल टेनिस, लॉन बॉन, स्क्वॉश आणि बॅडमिंटननंतर आता अॅथलेटिक्समध्येही भारताला मोटे यश मिळाले आहे.
Commonwealth Games 2022 |tejaswin shankar
Commonwealth Games 2022 |tejaswin shankar Twitter

Commonwealth Games 2022: भारताला कॉमनवेल्थ गेममध्ये वेटलिफ्टिंग, ज्युदो, टेबल टेनिस, लॉन बॉन, स्क्वॉश आणि बॅडमिंटननंतर आता अॅथलेटिक्समध्येही यश मिळाले आहे. भारताचा स्टार अॅथलीट तेजस्वीन शंकरनं (Tejaswin Shankar) बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. कॉमनवेल्थमधील उंच उडी स्पर्धेत भारताला (India) आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते.

* लवप्रीत सिंहची चांगली कामगिरी
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगच्या पुरूष 109 किलो ग्राम वजनी गटात लवप्रीत सिंहने चांगली कामगिरी केली. स्नेच प्रकारातील पहिल्या प्रयत्नात त्यानं 157 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 161 आणि तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचललं. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात 185 किलो ग्राम वजन उचललं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 189 आणि तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्राम उजन उचललं.

Commonwealth Games 2022 |tejaswin shankar
CWG 2022: पुरुष हॉकीमध्ये भारताची कॅनडावर 8-0ने मात

भारतीय क्रिकेट संघाची सेमीफायनमध्ये धडक
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्कारल्यानंतर भारतानं जोरदार कमबॅक केल आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारतानं पाकिस्तान आणि बार्बाडोसला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक दिलील आहे. पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) खेळणाऱ्या भारतीय संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.

* कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com