ISL Football

ISL Football

Dainik gomantak

चर्चिल ब्रदर्ससमोर गतविजेत्यांचा अडथळा, 'या' दोन्ही संघांची पहिली लढत

``गतविजेत्या संघाचा प्रशिक्षक या नात्याने माझ्यावरच जास्त दबाव आहे, त्यामुळे पुन्हा एकदा करंडक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे, ``
Published on

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेस जैव सुरक्षा वातावरणात रविवारपासून (ता. 26) सुरवात होत आहे. माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला पहिल्याच लढतीत गतविजेत्या गोकुळम केरळा संघाचा खडतर अडथळा पार करावा लागेल.

आय-लीग स्पर्धा पश्चिम बंगालमध्ये खेळली जाईल. गोव्यातील (goa) चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा यांच्यातील सामना कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर होईल. गतमोसमात या दोन्ही संघांत विजेतेपदासाठी चुरस होती. त्यांचे समान गुण झाले, मात्र गोलसरासरीत अव्वल राहिल्याने गोकुळम केरळास प्रथमच आय-लीग विजेतेपद मिळाले, तर चर्चिल ब्रदर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

रुमानियन पेत्र गिगी यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चिल ब्रदर्स यावेळच्या आय-लीग स्पर्धेत खेळत आहे. 2018-19 साली ते या संघाचे मार्गदर्शक होते, तेव्हा संघाने चौथा क्रमांक मिळविला होता. ``गतविजेत्या संघाविरुद्धचा सामना खडतरच असेल. उद्याच्या लढतीनिमित्त आम्ही काही विशेष नियोजन केलेले नाही. तीन गुणांसाठी आम्ही खेळत असून संघ आशावादी आहे,`` असे गिगी यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.

<div class="paragraphs"><p>ISL Football</p></div>
केरळा ब्लास्टर्ससमोर जमशेदपूरचे आव्हान, टिळक मैदानावर रंगणार सामना

नवोदित खेळाडूंवर भर

चर्चिल ब्रदर्स संघात नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. हल्लीच भारताच्या 23 वर्षांखालील संघातून खेळलेला ब्राईस मिरांडा चर्चिल ब्रदर्स संघाचा आश्वासक खेळाडू मानला जातो. तो एक चांगला खेळाडू असून त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात, त्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, असे गिगी यांनी सांगितले. ``प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास युवा खेळाडूंबाबत मला थोडी भीती आहे, कारण या पातळीवर ते फार सामने खेळलेले नाहीत. तरीही माझा त्यांच्या गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे,`` असे चर्चिल ब्रदर्सच्या प्रशिक्षकांनी नमूद केले.

विजेतेपद राखण्याचे उद्दिष्ट्य

इटालियन प्रशिक्षक व्हिन्सेन्झो आल्बेर्टो अन्नेसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना गोकुळम केरळा संघाने विजेतेपद राखण्याचे उद्दिष्ट्य बाळगले आहे. बचावपटू अमिनौ बौबा व आघाडीपटू रहीम ओसुमानू या परदेशी खेळाडूंवर त्यांची मदार असेल. ``गतविजेत्या संघाचा प्रशिक्षक (Instructor) या नात्याने माझ्यावरच जास्त दबाव आहे, त्यामुळे पुन्हा एकदा करंडक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे, `` असे गोकुळम केरळाच्या प्रशिक्षकांनी सांगितले.

चर्चिल ब्रदर्सची आय-लीगमधील (I-League) चमक

- विजेतेपद, 2 वेळा : 2008-09, 2012-13

- उपविजेतेपद, 3 वेळा : 2007-08, 2009-10, 2020-21

- तिसरा क्रमांक, 1वेळ : 2011-12

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com