वीस वर्षीय नीतिशने बुडापेस्ट (Budapest) येथे झालेल्या व्हेझेर्केप्झो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धेत विजेतेपद मिळविले. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने पाच विजय व चार बरोबरी नोंदविल्या. स्पर्धेत मातब्बर खेळाडूंना शह दिल्यामुळे त्याचे कामगिरी मानांकन २६१२ गुणांपर्यंत उंचावले आहे, अशी माहिती नीतिशचे वडील संजय बेलुरकर यांनी दिली. नोव्हेंबरच्या सुरवातीस नीतिशने बुडापेस्ट येथेच झालेल्या स्पर्धेत आयएम किताबासाठी आवश्यक २४०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला होता.
नीतिश जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छा दूत असून कुजिरा येथील एस. एस. धेंपो महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. हंगेरीतील चमकदार खेळाबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारतसिंग चौहान, जीनो फार्मास्युटिकल्सचे व्यावस्थापकीय संचालक डॉ. सागर साळगावकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर व पदाधिकारी, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे.
दमदार खेळ
ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्म प्राप्त करताना नीतिशने सर्बियाचा ग्रँडमास्टर पॅप मिसा याला नमविले, तर बेलारशियन ग्रँडमास्टर आंद्रे कोव्हालेव व भारतीय ग्रँडमास्टर चक्रवर्ती रेड्डी यांना बरोबरीत रोखले. याशिवाय भारतीय आयएम मनीष ख्रिस्तियानो, आयर्लंडचा फिडेमास्टर मर्फी कॉनर यांनाही हरविले. नीतिशने सर्वाधिक सात गुण प्राप्त केले. भारताचा ग्रँडमास्टर कार्तिक व्यंकटरमण या स्पर्धेत उपविजेता ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.