भारताचे नरेंद्र मोदी यांनी 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पॅरालिम्पिक चॅम्पियन्सची भेट घेतली. या खेळाडूंनी देशाला जागतिक स्तरावर अभिमानित केले. या दरम्यान खेळाडूंनी आपले अनुभव पीएम मोदींसोबत शेअर केले. भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आणि 19 पदके जिंकली. त्यांच्या सभेतील काही खास क्षणचित्रे.
प्रतिभाशाली भारतीय कर्तृत्वासाठी सुहास एलवायच्या पाठीवर पंतप्रधानांची कौतुकाची थाप
कृष्णा नगर आणि इतर खेळाडूंसोबत पदकांवर चर्चा करतांना पंतप्रधान
युवा खेळाडू पलक कोहली आणि तिच्या प्रेरणादायी प्रवासावद्दल चर्चा करतांना पंतप्रधान मोदी.
सकीना खातून आणि प्रशिक्षक फरमान बाशा यांच्याशी चर्चा करतांना भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदी
पॉवरलिफ्टर सकिना खातून यांच्या सोबतही पंतप्रधानांनी चर्चा केली
हा ऐतिहासिक क्षण साजरा करतांना सर्व खेळाडू आणि पंतप्रधान मोदी
अवनी लेखारा, सिंहराज अदाना, सुमित अंतिल, मनीष नरवाल, प्रमोद भगत, कृष्णा नगर, भाविना पटेल, निषाद कुमार देवेंद्र झाझरिया, योगेश कठुनिया, मरिअप्पन थंगावेलू, प्रवीण कुमार, सुहास यथीराज, सुंदर सिंह गुर्जर, अशा 54 खेळाडूंनी टोकीयो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या बाजूने भाग घेतला होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय पॅरालिम्पिक चॅम्पियन्सची भेट घेवून त्यांचे कौतुक केले आणि या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.