रोहित शर्मा कर्णधार बनताच टीम इंडियामध्ये एक्सपेरिमेंटचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता एक लिंक रवींद्र जडेजासोबत जोडली जात आहे. कारण रोहित शर्माचा इरादा थोडा वेगळा आहे. लखनऊ T20 मध्ये श्रीलंकेला 62 धावांनी पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) रवींद्र जडेजाबाबत (Ravindra Jadeja) आपली नवी योजना उघड केली आहे. ही योजना टीम इंडियामधील (Team India) जडेजाच्या फलंदाजी संबंधित आहे, ज्यामध्ये आता प्रमोशन पाहिले जाऊ शकते. तसेच, लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) पहिल्या T20 सामन्यापासून त्याने त्याची सुरुवात केली आहे. (Captain Rohit Sharma Will Promote Ravindra Jadeja)
दरम्यान, लखनऊ T20 मध्ये रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. 17 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या जडेजाला केवळ 4 चेंडूंचा सामना करता आला आणि तो 3 धावांवर नाबाद राहिला. दुसरीकडे अष्टपैलू जडेजाचे संघात पुनरागमन झाल्याने कर्णधार रोहित शर्मा खूपच खूश दिसत होता.
रोहितला जडेजाला टॉप ऑर्डरमध्ये खेळवायचे
रोहित पुढे म्हणाला, “मी त्याच्या संघातील पुनरागमानाने खूप आनंदी आहे. आम्हाला त्याच्याकडून आणखी काही हवे आहे. त्यामुळे आम्ही त्याला बॅटिंग ऑर्डरवर पाठवले. येत्या सामन्यांमध्ये तुम्हाला जडेजा टॉप ऑर्डरमध्ये खेळताना दिसेल.”
तो पुढे म्हणाला, “तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये. परंतु आम्हाला त्याचा वापर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये करायचा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्हाला त्याच्याकडून काय मिळवायचे आहे याबद्दल आम्ही स्पष्ट आहोत.
4 महिन्यांनी 'सर्जी' क्रिकेटमध्ये परतला
रोहित शर्माचे लखनऊ टी-20 द्वारे 4 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. या सामन्यात नाबाद 3 धावा करण्यासोबतच त्याने चेंडूसह एक विकेटही घेतली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत 3 षटकांत 44 धावांची भागीदारी केली.
टीम इंडियासाठी इशान किशनने (Ishan Kishan) सर्वाधिक 89 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 57 धावांची स्फोटक खेळी केली. या दोन डावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 199 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 137 धावांत आटोपला आणि 62 धावांनी सामना गमावला. यासह टीम इंडियाने 3 टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.