क्रीडा विद्यापीठाचे स्वप्न सत्यात येण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे : शरद पवार

खेळ आणि खेळाडूंचा प्रगती, प्रसार होण्यासाठी पूरक बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हाच आभ्यास या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून होणार आहे. या विद्यापीठाचे अधिनियम तयार करण्यात आले आहेत.
शरद पवार
शरद पवारDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे : आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (International Sports University) उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) केली आहे. ते उभे करण्याचे स्वप्न सत्यात येण्यासाठी सामाजिक बांधिलकी समोर ठेऊन उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी येथे व्यक्त केले.

छत्रपती क्रीडा संकुलमध्ये आज शरद पवारांच्या उस्थितीत एक आढावा बैठक झाली त्यावेळे ते बोलत होते. यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव वंदना कृष्णा, ऑलिंपियन अंजली भागवत आदी उपस्थित होते. यावेळी क्रीडा विद्यापीठाची आवश्यकता,ध्येय, उद्देश याबाबत सादरीकरण करण्यात आले.

शरद पवार
OBC Reservation: घरी बायकोने मारले तरी ते मोदीच जबाबदार: फडणवीस

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभे करण्यास एकूण ४०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा पैसा उभा करण्यासाठी छोट्या मोठ्या उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. विविध कंपन्यांचा सीएसआरचा उपयोग करुन घेण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी राखत आपला सीएसआर उपलब्ध करुन दिल्यास खूप मोठा भार हलका होईल. सध्या क्रीडा क्षेत्र खूप गतीमान झाले आहे. त्याच्यासोबत आपल्याला देखील धावावे लागेल. खेळ आणि खेळाडूंचा प्रगती, प्रसार होण्यासाठी पूरक बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हाच आभ्यास या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून होणार आहे. या विद्यापीठाचे अधिनियम तयार करण्यात आले आहेत. यामुळे क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती आणि पूरक उद्योग, क्रीडा प्रशिक्षण यांना तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे विद्यापीठ क्रीडा संकृती आणि खेळाडू यांच्या जडणघडणीत या विद्यापीठाचा वाटा मोठा असेल. असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com