Sanju Samson: क्लीन बोल्ड होताच संजू सॅमसनच्या नावावर झाला लाजीरवाणा रेकॉर्ड!

Sanju Samson, CSK vs RR: राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या संजू सॅमसनच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला.
Sanju Samson
Sanju SamsonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sanju Samson, CSK vs RR: राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या संजू सॅमसनच्या नावावर एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल-2023 सामन्यात (CSK vs RR), सॅमसन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने बोल्ड केले.

संजू सॅमसनची शिकार करण्यासाठी जडेजाने हे केले

वास्तविक, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 9 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात त्याने पहिल्यांदा देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनला क्लीन बोल्ड केले. संजूला काही कळेपर्यंत बॉलने आपले काम केले.

Sanju Samson
IPL 2023: कॅप्टन कूल रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला कर्णधार!

सर्वाधिक वेळा '0' वर आऊट

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व करणारा संजू सॅमसन (Sanju Samson) हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सर्वाधिक खेळणारा 0 वर आऊट होणारा खेळाडू ठरला आहे.

शेन वॉर्न आणि स्टुअर्ट बिन्नी हे माजी कर्णधार 7-7 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला अजिंक्य रहाणेही 5 वेळा रॉयल्सकडून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

पडिक्कलने 38 धावा केल्या

देवदत्त पडिक्कलने 26 चेंडूत 38 धावांची शानदार खेळी केली. तर संजू सॅमसन 2 चेंडूत खाते न उघडता परतला. पडिक्कलने 5 चौकार मारले.

Sanju Samson
IPL 2023: जगातील 'या' नंबर 1 कसोटी फलंदाजाने घेतला मोठा निर्णय, WTC फायनलसाठी इंग्लंडला रवाना

दोन्ही संघाची 11 इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.