गोव्याची भक्ती ‘अर्जुन’ पुरस्काराची दावेदार

गोवा बुद्धिबळ संघटनेस विश्वास, जागतिक पदकविजेतीचे उत्स्फूर्त स्वागत
Bhakti Kulkarni of Goa representing Indian Chess Team
Bhakti Kulkarni of Goa representing Indian Chess Team Dainik Gomantak

पणजी भारतीय बुद्धिबळ संघाचे (Indian Chess Team) प्रतिनिधित्व करताना गोव्याची (Goa) इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिने वर्षाभरात चार आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. साहजिकच ती अर्जुन पुरस्कारासाठी प्रबळ दावेदार असल्याचा विश्वास गोवा बुद्धिबळ संघटनेने (Goa Chess Team) व्यक्त केला. यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने यापूर्वीच भक्तीची शिफारस केंद्र सरकारला (Government) केली आहे.

स्पेनमध्ये झालेल्या जागतिक महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या भारतीय संघात भक्तीचा समावेश होता. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक आहे. मायदेशी परतलेल्या भक्तीचे सोमवारी दुपारी दाबोळी विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत झाले.

Bhakti Kulkarni of Goa representing Indian Chess Team
मुख्यमंत्री चषक स्पर्धेला 30 ऑक्टोंबर पासून सुरवात

भारताने गतवर्षी ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत, तसेच आशिया वूमन्स कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. दोन्ही वेळेस भक्ती भारतीय संघाची सदस्य होती व तिने संघाच्या सोनेरी कामगिरीत वाटाही उचलला होता. यावर्षीही ऑनलाईन पद्धतीने झालेल्या ऑलिंपियाड स्पर्धेसाठी भक्तीची विश्वनाथन आनंद याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात निवड झाली. यावेळी भारताला ब्राँझपदक मिळाले. स्पेनमधील जागतिक स्पर्धेत प्रमुख खेळाडू जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेती कोनेरू हंपी हिच्या अनुपस्थितीत भारताने रौप्यपदक मिळविले. अंतिम लढतीत त्यांना रशियाकडून हार पत्करावी लागली. भक्तीने साखळी फेरीत लागोपाठ विजय नोंदविले होते.

Bhakti Kulkarni of Goa representing Indian Chess Team
रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ऋत्विजने जेतेपदावर केला शिक्कामोर्तब

वर्षभरातील चार प्रमुख पदके, तसेच आशिया महिला विजेतेपद, राष्ट्रकुल महिला विजेतेपद, दोन वेळा राष्ट्रीय विजेतेपद ही भक्तीची कामगिरी दिमाखदार असून ती अर्जुन पुरस्कारासाठी योग्य असल्याचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर यांना वाटते.

रौप्यपदक हा भाग्याचा क्षण

भक्तीजागतिक महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक जिंकणे हा खऱोखरच भाग्याचा क्षण आहे. केवळ आपल्यासाठीच नव्हे, तर ही कामगिरी गोव्यासाठीही अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया भक्ती कुलकर्णीने दिली. देशासाठी पदक जिंकण्याची भावना अपूर्ण आनंदाची असल्याचेही मडगावच्या या बुद्धिमान खेळाडूने सांगितले. जागतिक रौप्यपदक विजेत्या भारतीय संघात भक्तीसह हरिका द्रोणवली, आर. वैशाली, तानिया सचदेव, मेरी ॲन गोम्स या खेळाडूंचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com