World Cup 2023: यंदाचा विश्वचषक गतविजेत्या इंग्लंडसाठी चांगला गेला नाही. इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. पण आता त्याच्यासमोर आव्हान आहे ते किमान टॉप 8 मध्ये राहून चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याचे.
दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा नवा चॅम्पियन मिळेपर्यंत केवळ इंग्लंड संघालाच चॅम्पियन म्हटले जाईल. आता इंग्लंडच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एक मोठी कामगिरी केली आहे. जे इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही करु शकले नाही.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) 10,000 पेक्षा जास्त धावा करणारा आणि 100 बळी घेणारा बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळताना बेन स्टोक्सने ही कामगिरी केली.
जर बेन स्टोक्सच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत 97 कसोटी सामने खेळले असून त्यात 6117 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी 36.41 आणि स्ट्राईक रेट 59.18 आहे. येथे त्याने 13 शतके आणि 30 अर्धशतके केली आहेत.
दुसरीकडे, जर त्याच्या ODI क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 112 सामने खेळल्यानंतर आतापर्यंत 3271 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्सची वनडेत सरासरी 39.89 आहे, तर त्याचा स्ट्राईक रेट 94.56 आहे.
स्टोक्सने वनडेमध्ये चार शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. बेन स्टोक्सने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 43 सामने खेळले असून त्याच्या नावावर 585 धावा आहेत.
त्याची सरासरी 21.66 आणि स्ट्राइक रेट 128 आहे. म्हणजे एकंदरीत बघितले तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये दहा हजार धावा केल्या आहेत.
तसेच, बेन स्टोक्सने 97 कसोटीत 197 विकेट्स घेतल्या असून आठ वेळा चार विकेट्स आणि चार वेळा पाच विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. जर आपण ODI बद्दल बोललो तर त्याने आतापर्यंत 112 सामन्यात 74 विकेट घेतल्या आहेत.
टी-20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 43 मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. म्हणजे एकूण विकेट्सची संख्या 200 ओलांडली.
सध्या बेन स्टोक्स दुखापतीने त्रस्त आहे, विश्वचषकानंतर (World Cup) त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, जेणेकरुन तो पूर्ण जोमाने आपल्या संघात सामील होऊ शकेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.