Belgium vs Canada: झुंजार कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची वर्ल्डकपमध्ये विजयी सुरुवात

FIFA World Cup 2022: बलाढ्य बेल्जियमने कॅनडाला 1-0 अशा गोलफरकाने पराभूत करत आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात दिली.
Belgium | FIFA World Cup 2022
Belgium | FIFA World Cup 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Belgium vs Canada: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत बुधवारी उशीरा ग्रुप एफमधील बेल्जियम विरुद्ध कॅनडा यांच्यात सामना झाला. हा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने 1-0 अशा गोलफरकाने जिंकला. असे असले तरी कॅनडाने त्यांना शेवटपर्यंत तगडी लढत दिली.

तब्बल 36 वर्षांनंतर फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या कॅनडाने बलाढ्य बेल्जियमला चांगले झुंजवले होते, अगदी त्यांना सुरुवातीलाच ऐतिहासिक गोल करण्याची संधीही मिळाली होती. पण, ही संधी हुकली. नंतर बेल्जियमकडून मिशी बत्शुआयीने पहिल्या हाफमध्ये एकमेव गोल केला.

Belgium | FIFA World Cup 2022
FIFA World Cup Matches In Inox: थिएटरमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार; गोव्यासह 'या' शहरांत आयनॉक्स करणार Live स्क्रीनिंग

कॅनडाला होती ऐतिहासिक गोलची संधी

कॅनडा (Canada) यापूर्वी 1986 मध्ये फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup) खेळले होते. पण त्यावेळी त्यांना एकही गोल नोंदवता आला नव्हता. त्यानंतर त्यांना 36 वर्षांनी वर्ल्डकपमध्ये खेळण्याबरोबरच पहिला गोल करण्याचीही संधी होती.

बेल्जियमच्या (Belgium) यानिक कॅरास्कोने चेंडू हाताळल्याने सामन्याच्या 11 व्या मिनिटाला कॅनडाला पेनल्टी मिळाली होती. त्यामुळे कॅनडाचा अलफोन्सो डेव्हिसने पुढे येत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेल्जियमचा दिग्गज गोलरक्षक थिबॉट कोर्टोइस याने तो गोल अडवला.

Belgium | FIFA World Cup 2022
FIFA World Cup: फिफा वर्ल्ड कपमध्ये का होतेय पाकिस्तानची चर्चा? जाणून घ्या

बत्शुआयीचा एकमेव गोल

त्यानंतरही कॅनडाचे आक्रमण सुरूच होते. त्यांच्या स्पीडने बेल्जियमला संपूर्ण सामन्यात संघर्ष करायला लावला. त्यांनी पहिल्या हाफमध्ये सतत गोल करण्याच्या प्रयत्नात बेल्जियमच्या गोलरक्षकाला व्यस्त ठेवले होते. परंतु, अखेर 44 व्या मिनिटाला बत्शुआयीने संधी साधत बेल्जियमसाठी पहिला गोल नोंदवला आणि आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांचा चेंडूवरील ताबा जवळपास सारखेच होते. तसेच पासेसची अचूकताही सारखी होती.

पहिल्या सामन्यात तरी कॅनडाचा दृष्टीकोन गमावण्यासाठी काही नसल्याने निडर दिसला. तर या स्पर्धेत बेल्जियम मात्र विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून उतरले आहेत. आता 27 नोव्हेंबरला कॅनडाला क्रोएशियाचा आणि बेल्जियमला मोरोक्कोचा सामना करायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com