Cricketers Turned Politician: भज्जी पूर्वी 'या' सात क्रिकेटपटूंनीही लढवली होती निवडणूक

'भज्जी' (Harbhajan Singh) या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय फिरकीपटू आता क्रिकेटनंतर राजकारणात उतरला आहे.
Harbhajan Singh & Gautam Gambhir & Navjyot Singh Sidhu
Harbhajan Singh & Gautam Gambhir & Navjyot Singh SidhuDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू असणाऱ्या हरभजन सिंगला आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यासह 'भज्जी' (Harbhajan Singh) या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय फिरकीपटू आता क्रिकेटनंतर राजकारणात उतरला आहे. मात्र, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणारा हरभजन हा पहिला क्रिकेटपटू नाही. त्याच्या आधी आणखी सात क्रिकेटपटूंनी राजकारणात नशीब आजमावले आहे. त्यातील काही विजयी होऊन मंत्रीही झाले तर काहींच्या पदरी निराशा पडली. चला जाणून घेऊया अशा क्रिकेटपटूंबद्दल ज्यांनी राजकारणात प्रवेश केला. (Before Harbhajan Singh seven cricketers had contested the elections)

दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेता खेळाडू असणाऱ्या गौतम गंभीरने (Gautam Gambhir) क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवले. तो 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाला. विशेष म्हणजे पूर्व दिल्लीतून खासदारही झाला. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammad Azharuddin) 2009 मध्ये राजकारणात प्रवेश करत काँग्रेस पक्षाचा हात पकडला. भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या अझरुद्दीनने लोकसभा निवडणूक लढवली आणि मुरादाबादमधून खासदारही बनले. भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूने (Navjyot Singh Sidhu) क्रिकेटसोबतच राजकारणातही आपली छाप सोडली. 2004 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये (Bjp) प्रवेश केला. त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर सिद्धू यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करत अमृतसरमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, यावेळी त्यांना पंजाब निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Harbhajan Singh & Gautam Gambhir & Navjyot Singh Sidhu
आप कडून हरभजन सिंगला राज्यसभेची उमेदवारी जाहीर

तसेच, भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने (Manoj Tiwari) अद्याप क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नसली तरी आता त्याने आपली राजकीय खेळी सुरु केली आहे. 36 वर्षीय मनोजने 2021 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला आहे. त्याने हावडामधील सिबपूरमधून बंगाल विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्याचे क्रीडामंत्री बनवले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेते खेळाडू कीर्ती आझाद यांनी राजकारणात आपली छाप सोडली आहे. ते इथे भाजपमध्ये दाखल झाले आणि दिल्लीच्या गोल मार्केट विधानसभेतून आमदार झाले. यानंतर त्यांनी 2014 मध्ये दरभंगामधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली.

शिवाय, भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांनीही राजकारणात नशीब आजमावले परंतु त्यांची निराशा झाली. त्यांनी दोनदा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक मोहम्मद कैफने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने आणि शानदार क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली, परंतु राजकारणाच्या मैदानावर त्याची मात्र निराशा झाली. 2014 मध्ये त्याने अलाहाबादमधील फुलपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्याचा पराभव झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com